माझी जीवन शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

शिरुर,ता.११ फेब्रुवारी २०१८(प्रतिनीधी): शिरुर मधील काची आळी येथे माझी जीवन शाळेच्या वर्षपुर्तीनिमित्त शंभर विद्यार्थ्यांसह महिलांची आरोग्यतपासणी करण्यात आली.

अहमदनगर येथील संकल्प प्रतिष्ठान या संस्थेच्या मार्फत शिरुर मधील काची आळी येथे माझ्या जीवन शाळेत  १०० हुन अधिक वंचित विद्यार्थ्यांना गेल्यावर्षभरापासुन मोफत शिक्षण दिले जाते.या संस्थेला वर्षपुर्ती झाल्यानिमित्त येथील संस्थेत मुलांचे व येथील महिलांचे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात १०० मुलांची व २० महिलांची अहमदगर येथील आकांक्षा रिहॅबिलिटेशन संस्थेच्या वैद्यकिय पथकाने तपासणी केली.या मध्ये विशेषत: डोळ्यांचे, किडनीचे, मुञाशयाचे, त्वचेचे व कुपोषणाची तपासणी करुन मोठ्या प्रमाणावर निदान करण्यात आले.या वेळी मोफत अौषधे देण्यात आली.

या वेळी बालरोग तज्ज्ञ डॉ.सुभाष फिरोदिया,आकांक्षा रिहॅबिलिटेशन संस्थेच्या सविता काळे,एल अॅंड टीचे डॉ.लक्ष्मिकांत जोशी, संकल्प प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष नितेश बनसोडे,माझी जीवन शाळेच्या मुख्याध्यापिका जनाबाई मल्लाव, वैशाली तिवारी आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या