रांजणगाव देवस्थानमधील सेवकांचे धरणे आंदोलन योग्य

रांजणगाव गणपती, ता. 13 फेब्रुवारी 2018: रांजणगाव देवस्थानमधील सेवकांचे धरणे आंदोलन योग्य असल्याचा कौल वाचकांनी www.shirurtaluka.com वर नोंदविला आहे.

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट रांजणगाव गणपती देवस्थानमध्ये गेली 15 ते 20 वर्षे कार्यरत असणाऱया सेवकांच्या विविध मागण्या करिता तसेच विश्वस्तांच्या बेकायदेशीर मनमानी कारभाराच्या विरोधात सहधर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे यांच्या समोर भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखली धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा संघटनमंत्री बाळासाहेब भुजबळ यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली होती. मात्र, संघटनेचे पदाधिकारी व सहाय्यक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांच्या दरम्यान झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.

रांजणगाव देवस्थानमधील सेवकांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर www.shirurtaluka.com ने संकेतस्थळावर 5 ते 11 फेब्रुवारी 2018 दरम्यानच्या काळात पुढील प्रमाणे मतचाचणी घेतली होती.


रांजणगाव देवस्थानमधील सेवकांचे धरणे आंदोलन योग्य आहे, असे आपणास वाटते काय?
होय - 100 टक्के
नाही - 0 टक्के
माहित नाही - 0 टक्के

संकेतस्थळावर वाचकांनी मते नोंदविताना आंदोलन योग्य असल्याचा कौल 100 टक्के वाचकांनी दिला आहे.

कर्मचाऱयांच्या प्रमुख मागण्याः
1) शैक्षणीक पात्रता नसतानाही व देवस्थानमध्ये गैरकृत्य करणाऱया व्यवस्थापकाला त्वरीत कामावरून कमी करण्यात यावे.
2) देवस्थान व समाजाची फसवणूक करणारे विश्वस्त मंडळ त्वरीत बरखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा.
3) गेली तीन वर्षे विश्वस्तांनी केलेल्या सर्व कामाची चौकशी धर्मादाय आयुक्त यांच्या मार्फत करण्यात यावी.
4) सेवकांना त्वरीत सन 2016 पासून पगार वाढ लागू करण्यात यावी.

संबंधित बातम्याः

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या