निमोण्याच्या युवकाला शिवशाही एसटी बसने ठोकरले

निमोणे, ता.१८ फेब्रुवारी २०१८(प्रतिनीधी) : निमोणे (ता. शिरूर)लगत दुर्गेवस्ती येथील लक्ष्मण ज्ञानदेव घेगडे या युवकाचा पळवे (ता. पारनेर) गावच्या हद्दीत झालेल्या भिषण अपघातात मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, निमोणे (ता.शिरूर) लगत दुर्गेवस्ती येथील लक्ष्मण ज्ञानदेव घेगडे ( वय-३०) हा गरीब घरातील युवक हमाली काम करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. शुक्रवार (दि. १६) रोजी निमोणे येथून कांदा भरलेल्या पिकअप टेम्पो सोबत अहमदनगर मार्केटकडे जात असताना, पळवे गावच्या हद्दीत हॉटेल जय मल्हार जवळ त्यांचे वाहन पंक्चर झाले. पंक्चर काढण्यासाठी तो चालकासमवेत खाली उतरला. व पंक्चर काढून झाल्यावर आपल्या वाहनात बसण्याच्या तयारीत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या  शिवशाही एस्.टी. बसने ( MH-06 DW 0450) जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची फिर्याद एकनाथ हरिभाऊ रसाळ (रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा) यांनी सुपा पोलीस ठाणे येथे दिली असून, त्यानंतर बसचालक भाऊसाहेब नानासाहेब वीरकर (रा.सराफ बाजार, कोपरगांव, जि. अहमदनगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान शनिवार (दि. १७) रोजी दुपारी मयत लक्ष्मण यांच्यावर  शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार  करण्यात आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या