डोंगरगणच्या मुली राञी उशिरापर्यंत बससाठी ताटकळत

शिरुर, ता.१८ फेब्रुवारी २०१८ (प्रतिनीधी) : शिरुरला एस टी स्टॅंड वर डोंगरगणच्या शालेय मुलींना राञीच्या तब्बल नऊ वाजेपर्यंत एसटीची वाट पाहत ताटकळत थांबण्याचा अजब धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.१७) राञी घडला.

शिरुर बस आगारात एसटीच्या वेळापञकाचा अन कारभाराचा फटका सर्वसामान्यांना नेहमीच अनुभवायला मिळतो. शनिवारी (दि.१७) रोजी सायंकाळच्या सुमारास डोंगरगणकडे जाणारी एस.टी बस लागलीच नाही. याबाबत मुलींनी याबाबत वारंवार विचारणा केली. परंतु गाडी येइल असे सांगण्यात आले. परंतु राञी साडेआठ वाजले तरीही एस.टी बस डेपोत आलीच नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी संपर्क साधल्यानंतर बस डेपोतील कर्मचा-यांशी विचारपुस केली असता, एस.टी फेल झाली असुन दुसरी बस त्या मार्गे येत असल्याचे कारण सांगण्यात आले.

शनिवारी साडेपाचपासून एसटी बस साठी शिरुर आगारात राञी नऊ पर्यंत दुर्गम भागातील मुली शिरुर आगारात ताटकळत थांबल्या. शिरुर शहरात शिरुर आगारात राञी नउ नंतर गर्दी नसतेच परंतु जर मुलींच्याबाबत गैरप्रकार घडला तर जबाबदार कोण ? असा सवाल व्यक्त केला जात आहे. एस.टी वेळेवर न लागल्याने, दिलेल्या थांब्यावर न थांबणे आदी प्रकार वारंवार घडत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.तर शनिवारी माञ शिरुर आगारात हा कळसच पहायला मिळाला.

शालेय मुलींना जर प्रशासन अशा पद्धतीने वेठीस धरत असेल व काही अनुचित प्रकार घडल्यास कोणाला जबाबदार धरायचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या