रोटरी क्लबच्या शिबीरात 530 रुग्णांची तपासणी (Video)

Image may contain: 10 people, people smiling, table and indoor
शिक्रापूर, ता. 19 फेब्रुवारी 2018: शिक्रापूर येथे रोटरी क्लबच्या वतीने रविवार (दि.18) मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 530 रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले, अशी माहिती शिक्रापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गायकवाड व सचिव प्रा. संजय देशमुख यांनी दिली.

आरोग्य शिबिराचे आयोजन ही ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक बाब असून ती काळाची गरज आहे, असे मत माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांनी शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई मांढरे, शिक्रापरच्या सरपंच, डॉ. मच्छिंद्र गायकवाड, डॉ. राम पोटे, डॉ. चंद्रकांत केदारी, डॉ. धनंजय लोंढे, डॉ. शरद लांडगे, डॉ. बापूसाहेब इंगळे, श्री. संजय देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांचे हिमोग्लोबिन, रक्तदाब, वजन, उंची, शुगर, इसीजी, दमा तपासणी, हाडांची घनता तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करणअयात येऊन आवश्यकतेनुसार औषध वाटप व हस्तीदोष असणाऱया 82 रुग्णांना अल्पदरात चष्मेवाटप करण्यात आले. मोतीबिंदू असणाऱया 21 रुग्णांना मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मोहन ठुसे नेत्र रुग्णालय नारायणगाव येथे पाठविण्यात आले.

नोबल हॉस्पिटलमधील डॉ. विजयसिंह पाटील, डॉ. पंकज भिसे (हृदयरोग तज्ज्ञ), डॉ. अभिजित शिंदे, डॉ. तेजस भुजबळ (बालरोग तज्ज्ञ), डॉ. विशाल खोत (अस्थिरोग तज्ज्ञ), डॉ. संतोष राईज (नेत्ररोग तज्ज्ञ), डॉ. धनंजय लोंढे (स्त्री रोग तज्ज्ञ) यांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले. शिक्रापूर येथील आरोग्यसेवक यांनीही मोलाची मदत केली.

रोटरीच्या सर्व क्षेत्रातील कामाचा चढता आलेख व कार्यपद्धती याबाबत प्रशंसा करून रोटरीचे हे कार्य समाजाच्या विकासाला हातभार लावत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन रोटरीचे सदस्य श्री. संजय मांढरे, प्रास्ताविक डॉ. मच्छिंद्र गायकवाड व आभार डॉ. वैजनाथ काशीद यांनी केले.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या