गाडी घासल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद

शिरुर,ता.२० फेब्रुवारी २०१८(प्रतिनीधी) : गाडी घासल्याच्या वादातुन दोन गटांत वाद झाल्याने शिरुर पोलीस स्टेशनला परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव अनिल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे कि,केशव शिंदे हे स्विफ्ट कार मधुन शिरुर येथे जात असताना माळिमळा(अण्णापुर) येथे फिर्यादीची कार ओम्नी गाडीला घासल्याने सुहास शिंदे याने लोखंडी पाईपने फिर्यादीस मारहाण केली तर दिपक शिंदे, हर्षल थोरात व त्याच्या साथिदारांनी मारहाण केली.तर संदिप शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अण्णापुर येथे झालेल्या वादातुन चिडुन जाउन फिर्यादीचा भाउ सुहास शिंदे यास केशव अनिल शिंदे, विशाल शिंदे, शहाजी शिंदे, चेतन शिंदे यांनी लाथा बुक्कयाने मारहाण व चाकुने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी शिरुर पोलीसांनी दोन्ही गटांविरुद्ध तक्रारी नोंदवल्या असुन पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के.आर.घोंगडे, पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे हे तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या