शिवतक्रार म्हाळुंगीला बंधा-यात एकजन बुडाला

शिरुर, ता.२० फेब्रुवारी २०१८(प्रतिनीधी) : शिवतक्रार म्हाळुंगी(ता.शिरुर) परिसरात बंधा-यात बुडुन एकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली असुन आज मंगळवार(दि.२०) रोजी दिवसभर मृतदेहाचा शोध घेउनही मृतदेह मिळु शकला नसल्याची माहिती मिळते.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,दादा साळुंखे असे मयत व्यक्तीचे नाव आहे.सोमवार(दि.१९) रोजी दादा साळुंखे यांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला.त्यानंतर सोमवार व आज मंगळवार(दि.२०) रोजी पर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला परंतु तरीही त्यांचा मृतदेह मिळुन आला नाही.याबाबत शिरुर चे तहसिलदार रणजित भोसले यांच्याशी संपर्क साधला असता, एनडीआरएफ ची टिम आल्यानंतर उद्या(दि.२१) रोजी सकाळी पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले.आज दिवसभर घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ, शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलीस प्रशासनाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

घटना नेमकी कशी घडली याबाबत सविस्तर माहिती मिळु शकली नाही.(सविस्तर वृत्त लवकरच...)

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या