शिरुरला शिवजयंतीत फेटे अन सेल्फीची भलतीच क्रेझ

Image may contain: 19 people, people smiling, people standing, crowd and outdoor

शिरूर
, ता.२१ फेब्रुवारी २०१८ (प्रतिनीधी) :
शिरुर शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मिरवणुक  महिलांनी परिधान केलेले फेटे अन सेल्फीच्या क्रेझमुळे सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेत होती.

शिरुर शहरात सकाळी शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्या उपस्थितीत आस्वाद नजीक शिरुर शहर उत्सव समितीच्या वतीने छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.या अभिवादनाला शिरुर शहरातील सर्व नागरिक, नगरसेवक, नगरसेविका यांसह विविध पक्षांतील पदाधिकारी उपस्थित होते.

शिरुर शहरात दिवसभरांत विविध रॅलीचे आगमन होत होते.सायंकाळी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन सार्वजनिक मिरवणुकिला प्रारंभ झाला.या वेळी या मिरवणुकित सहभागी झालेल्या महिलांनी भगवे फेटे परिधान केले असल्याने उपस्थितांचे लक्ष वेधुन घेत होते.यात लहान मुलींपासुन ते ज्येष्ठ महिलांनीही उत्सफुर्तपणे सहभाग नोंदविला..फेटे परिधान केलेल्या सर्वच सेल्फी काढण्यासाठी सरसावल्या होत्या.अनेकांनी फोटो काढण्याचा आनंद यानिमित्ताने घेतला.

या मिरवणुकित पारंपारिक वेशभुषेत टाळ-मृदुंगात भजने गायली जात होती.त्याचप्रमाणे ढोल ताशाचा ही दणदणाट होत होता.त्यापाठोपाठ बॅंड चेही सुर पहावयास मिळत होते.विविध ठिकाणी मर्दुमकीचे प्रात्याक्षिकेही करण्यात आली.शिरुर शहरात दिवसभर शिवजयंतीनिमित्त दिवसभर भगवेमय वातावरण अनुभवायला मिळाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या