'अपरिचित योध्दा, कुलश्रेष्ठ साबूसिंग पवार' पुस्तक प्रकाशीत

Image may contain: 4 people, people smiling, people standing and indoor
Image may contain: textपुणे, ता. 21 फेब्रुवारी 2018: छत्रपती शाहू महाराज (कोल्हापूर) यांच्या हस्ते शिवजयंतीच्या मुहूर्तावर 'अपरिचित योध्दा, कुलश्रेष्ठ साबूसिंग पवार (शंभूसिंग परमार)' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हिमांशु रविंद्र पवार (आमदाबादकर), ऋषिकेश रविंद्र पवार (आमदाबादकर) व दिग्विजयसिंह सुभाषचंद्र पवार (वाघाळकर) हे पुस्तकाचे लेखक आहेत.

श्रीमंत साबूसिंग पवार हे आमदाबाद, वाघाळे, मलठण, धार, देवास व नगरदेवाली इत्यादी या पवार राज घऱाण्याचे मुळ पुरूष होते. महाराष्ट्र व मध्यप्रदेश मधील पवार घराण्याचे मूळ पुरुष साबूसिंग पवार यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. पुस्तकात साबूसिंग पवार यांच्या आयुष्याबद्दल लहानपणा पासून ते स्वराज्या साठी केलेल्या कामांबद्दलची माहिती असून, हे पुस्तक त्यांच्या वंशजांनी लिहीले आहे. ईश्वरी प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

इतिहासप्रेमींनी या पुस्तकाचे स्वागत केले असून, यामुळे इतिहासाला नव्याने उजाळा मिळाला आहे. साबूसिंग पवार यांच्यावरील हे आगळ्या-वेगळ्या प्रकारचे हे 360 वर्षातील पहिलेच पुस्तक आहे.
Image may contain: 3 people

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या