शिरुर बाजारसमितीत रेकॉर्ड ब्रेक कांदा आवक

शिरुर,ता.२२ फेब्रुवारी २०१८(प्रतिनीधी) : शिरुर येथील नविन मार्केट यार्डवर सुरू केलेल्या कांदा बाजारमध्ये पहिल्याच दिवशी सुमारे 15 ते 20 हजार कांदा पिशवीची आवक झाली.तर प्रती क्विंटल 1650 ते 2200 दर मिळाला. कांद्याला मिळालेला दर हा पुणे व मुंबई येथील मार्केट पेक्षाही जास्त होते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी खरेदीदार व्यापाऱ्यांचे अभिनंदन केले.याबाबत अधिक माहिती देताना बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी संचालक मंडळाच्या अथक प्रयत्नांनी शिरुर बाजारसमितीत कांदा बाजार सुरु करण्यात यश आल्याचे सांगत  शेतक-यांच्या हिताचाच बाजासमिती सातत्याने विचार करत असल्याचे सांगितले.संचालक विजेंद्र गद्रे यांनी शशिकांत दसगुडे व सर्व संचालक तसेच व्यापारी वर्गाने साथ दिली यामुळेच बाजार सुरु केला असुन याचा शिरुर, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्याला फायदा होणार असल्याचे सांगितले.

सचिव दिलीप मैड यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सांगीतले की, यार्डवर कांदा विक्रीसाठी आणताना वाळवुन, निवडुन व वेगवेगळ्या बारदाण्यामध्ये दर बुधवारी व रविवारी सकाळी 11.00 चे आतमध्ये यार्डवर विक्रीसाठी आणावा. त्यामुळे चांगला बाजार मिळणेस उपयोग होईल.

सदर प्रसंगी दानशुर व्यक्ती व कांद्याचे प्रसिद्ध खरेदीदार बाबुशेठ बोरा, बाजार समितीचे संचालक वसंतकाका कोरेकर, शंकरदादा जांभळकर, संतोषशेठ मोरे, आबाराजे मांढरे, सतिष कोळपे सर, प्रविन चोरडीया, बंडुशेठ जाधव, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, खरेदी विक्री संघाचे संचालक सर्जेराव दसगुडे, सुरेश पाचर्णे, सचिन पवार,तसेच आडतदार रामभाऊ हेलावडे, अशोक बोऱ्हाडे, नंदकुमार पाचर्णे, सुभाष वाखारे, धनंजय बोरा, संजय पोखर्णा, राजेंद्र गिते, सागर सुर्यवंशी, योगेश पठारे, विजय पळसकर, चंद्रशेखर सुर्यवंशी, धन्यकुमार फिरोदीया, अनिल मेहेत्रे, संजय लकडे, संभाजी अडसुळ, रामदास आंधळे, संतोष चोरडीया, मच्छिंद्र रोडे, दशरथ गरदरे त्याचप्रमाणे पुणे,नगर, पारनेर, श्रीगोंदा, पिंपळे जगताप, मंचर, खेड येथील अनेक खरेदीदार व्यापारी तसेच हजारो शेतकरी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या