मोराची चिंचोलीत शिवजयंती उत्साहात साजरी (Video)

Image may contain: 4 people, people standing

चिंचोली मोराची
, ता. 22 फेब्रुवारी 2018 (विलास धुमाळ):
शिवभिमान कला क्रीडा मंच व ग्रामस्थांच्या वतीने येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उत्सवाचे हे 8वे वर्षे होते.

गावातील लहान-मोठ्यांसह शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर गेले होते. गावातून छत्रपती शिवाजी महाराज व आई जिजाऊ यांची अश्वारूढ मिरवणूक ढोल-ताशांच्या गरजात काढण्यात आली होती. यावेळी जिवंत देखावा साकारण्यात आला होता. संपूर्ण गाव या मिरवणूकीत सहभागी झाले होते. यावेळी युवकांनी ढोल-लेझीमच्या तालावर पारंपारिक नृत्य सादर करत लक्ष्य वेधून घेतले.संध्याकाळी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 30 वक्ते सहभागी झाले होते. राजा म्हाळसाकांत ट्रस्टच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष प्राविण्य मिळविलेल्या सत्कारमूर्तींचाही सत्कार करण्यात आला. रात्री ऍड. दादासो विठ्ठल नाणेकर यांच्यातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवम्यात आला होता. फटाक्यांच्या आतशबाजीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या