पेट्रोल-डिझेलच्या किंमती लागल्या घसरु...


No automatic alt text available.

शिरुर
, ता.२२ फेब्रुवारी २०१८(सतीश केदारी) :
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्याने गेल्या दहा दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होउ लागल्या आहेत.


गेल्या काहि महिन्यांपुर्वी पेट्रोल व डिझेलच्या किंमतींत प्रचंड वाढ झाली होती.या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असल्याने सरकारवर विरोधी पक्षाने टिकेची झोड उठवली होती.त्याचबरोबर देशभर आंदोलनेही करण्यात आली होती.परंतु फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यापासुन या किंमती कमी होत असल्याचे चिञ आहे.याबाबत जाणकारांनी आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाचे भाव घसरत असल्याचे कारण सांगितले असुन आगामी काळात हे भाव पुन्हा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येउ शकतात अशा शक्यता वर्तविल्या आहेत.
पाहुयात कधी व कशा किंमती कमी झाल्यात ते-
(दिनांक, पेट्रोलचे दर,डिझेलचे दर-प्रति लिटर प्रमाणे)

09 फेब्रुवारी    81.18  67.22
10 फेब्रुवारी    81.16  67.15
11 फेब्रुवारी    81.05  67.00
14 फेब्रुवारी    80.78  66.59
15 फेब्रुवारी    80.63  66.40
16 फेब्रुवारी    80.36  66.09
17 फेब्रुवारी    80.08  65.82
18 फेब्रुवारी    79.92  65.61
19 फेब्रुवारी    79.77  65.49
20 फेब्रुवारी    79.59  65.33
21 फेब्रुवारी    79.58  65.34
22 फेब्रुवारी    79.56  65.33
(सौजन्य.साई सहारा व साई गणेश पेट्रोलियम,शिक्रापुर)

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या