सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार-सोमनाथ अभंग (Video)

रांजणगाव गणपती, ता.२३ फेब्रुवारी २०१८(प्रतिनीधी) : रांजणगाव गणपती येथील  वॉर्ड क्रमांक ६ मध्ये रखडलेला विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वॉर्ड क्र.६ चे अपक्ष उमेदवार सोमनाथ अभंग यांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना सांगितले.

रांजणगाव गणपती येथील ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक सुरु असुन वॉर्ड क्रमांक ६ मधुन अपक्ष उमेदवार म्हणुन निवडणुक लढवत आहेत.या निवडणुकिसाठी अत्यंत चुरस निर्माण झाली असुन अपक्ष उमेदवाराची नागरिकांमध्ये मोठ्या प्रमानावर चर्चा सुरु आहे.या पार्श्वभुमीवर अभंग यांच्याशी बातचीत केली असता, प्रामुख्याने वॉर्ड क्रमांक ६ मधील नागरिकांचे मुलभुत प्रश्न, देवाची वाडीला येणारा कचरा बंद करणे, तसेच या वॉर्ड मधील के.टी बंधारे बांधणे, अंतर्गत रस्ते बांधण्यासाठी पाठपुरावा करणे, वाड्या-वस्त्यांवरील बंद पथदिवे सुरु करणे,जि.प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम, स्मशानभुमी सुशोभिकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सोमनाथ गणपत अभंग यांनी सांगितले.

या जागेसाठी अटितटीची लढत होत असुन अभंग या तरुण युवकाने चांगले आव्हान निर्मान केले आहे. (दि.२७) रोजी मतदान होणार असून, या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या