शिक्रापूरात खून करणाऱ्याला दहा तासात अटक

शिक्रापूर, ता.२४ फेब्रुवारी २०१८ (प्रतिनीधी) :  अज्ञात कारणावरून एकावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार घडला असताना त्याच दिवशी गुरुवारी (ता. 22) रात्री दारू पिण्याच्या कारणाहून एका कामगाराचा तिघांनी खून केला असल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलिसांनी खून करणाऱ्या एका आरोपीला दहा तासात अटक केली आहे.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथे एका बिल्डिंगमध्ये काम करणारे नागेंद्र राजभर, रवींद्र राजभर, निजाम शेख व घनशाम पटेल हे चार कामगार राहत असून त्यांचामध्ये दारू पिण्यावरून किरकोळ भांडणे होत होते, बुधवारी (ता. 21) देखील या चौघांमध्ये दारू पिण्याच्या किरकोळ कारणावरून भांडणे झाले, यावेळी दारू पिताना झालेल्या भांडणात रवींद्र याने तिघांना देखील तोंडात मारले व त्यांच्यामध्ये भांडण झाले त्यावेळी घनशाम याने देखील रवींद्र याला मारले असताना रवींद्र, नागेंद्र व निजाम या तिघांनी मिळून घनशाम पटेल याला मारहाण केली त्यावेळी रवींद्र याने घनशाम याला डोके धरून शेजारील भिंतीवर आदळले, त्यावेळी डोक्याला जबर मार लागल्याने घनशाम हा रक्तबंभाळ झाला त्यामुळे नागेंद्र राजभर, रवींद्र राजभर, निजाम शेख हे तिघे देखील पळून गेले त्यांनतर कामगारांचे सुपरवायझर असलेले राजेंद्र शेळके हे त्या ठिकाणी आले असता त्यांना घनशाम हा रक्तबंभाळ अवस्थेत पडलेला दिसला.

त्यावेळी त्यांनी शेजारी पहिले असता त्यांना दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या तेव्हा शेळके यांनी घनशाम जवळ जाऊन पहिले असता घनशाम विद्यानाथ पटेल वय ४० वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे मूळ राहणार उरदहा ता. कुशीनगर जि. कुशीनगर उत्तरप्रदेश हा मृत्युमुखी पडलेला असल्याचे त्यांना दिसून आले त्याचवेळी शेळके यांचा कामगार रवींद्र याचा त्यांना फोन आला तेव्हा तुम्ही कोठे आहे असे विचारले असता आमचे व पटेलचे भांडण झाले असून आम्ही त्याला मारहाण केली आहे असे म्हणून रवींद्र याने फोन कट केला, त्यामुळे त्यांनी शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने, पोलीस नाईक बाळासाहेब थिकोळे, तेजस रासकर आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, त्यानंतर आरोपींचा शोध घेत असताना खून करून पळून जाणाऱ्यांचा शोध सुरु केला.

यावेळी एकजण चाकण येथे गेला असल्याचे समजले त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस नाईक प्रल्हाद सातपुते, विजय गाले यांनी चाकण येथे जाऊन माणिक चौक चाकण येथून निजाम उर्फ नजमुद्दीन शेख याला ताब्यात घेतले त्याचेकडे चौकशी केली असता आमच्या झालेल्या भांडणातून आम्ही पटेल याला मारहाण केली व तो मयत झाला असल्याचे त्याने सांगितले.

सदर गुन्ह्यातील नागेंद्र राजभर व राजेंद्र राजभर हे दोघे सख्खे भाऊ फरार झाले आहेत. याबाबत राजेंद्र सोपान शेळके (वय ३२ वर्षे रा. वरुडे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी निजाम उर्फ नजमुद्दीन शेख, नागेंद्र राजभर व राजेंद्र राजभर या तिघांना विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले हे करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या