इंग्लिश स्कूल जांबूतचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

Image may contain: 7 people, people smiling, people standing and people on stage
जांबूत, ता. 26 फेब्रुवारी 2018 :
आदर्श ग्राम विकास प्रतिष्ठान संचालीत आदर्श इंग्लिश स्कूल जांबूतचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शाळेच्या नविन प्रांगणात शनिवारी (ता २४) सायंकाळी शिरूर महसूल विभागाचे प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी शिरुरचे तहसिलदार रणजीत भोसले व चाकण येथील एसएपीएल कंपनीचे संचालक राजीव रिसबूड, ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा पुणे जिल्ह्याचे उप जिल्हाधिकारी रामदास जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माजी पं. स. सदस्य वसुदेव आण्णा जोरी, जांबूतच्या सरपंच डॉ. जयश्रीताई जगताप, उपसरपंच शरद पळसकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी जगताप, जयमल्हार हायस्कूल जांबूतचे मुख्याध्यापक कापसे, माजी सरपंच बाळुशेठ फिरोदिया, घेवरचंद (बाबाशेठ) फिरोदिया, बाळकृष्ण कड, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब बदर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. फलके, डॉ. पोटे, डॉ. मावळे, योगेश जोरी, अनिल जोरी, शाकूराव कोरडे, सुभाष कोरडे (गुरुजी), ग्राम पंचायत सदस्य फक्कडराव गाजरे, नवनाथ जोरी, गणेश सरोदे, पंढरीनाथ गाजरे, सौ. आशा थोरात, सौ. रत्ना पळसकर, मंडळ अधिकारी वाल्मिकी, तलाठी धुरंदर माजी चेअरमन पांडाशेठ जगताप, नाथाशेठ जोरी, रेनवडीचे माजी सरपंच संतोष येवले व ग्रामस्त व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.

यावेळी शाळेतील विविध स्पर्धांत यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुण दर्शनाच्या कार्यक्रमातून उपस्थितांची मने जिंकत वाहवा मिळवली. यावेळी बोलताना प्रांताधिकारी गलांडे यांनी शिक्षण हाच सर्वांगीण विकासाचा पाया आहे व मुलींच्या शिक्षणासाठी या ठिकाणी उभारलेल्या सुंदर वास्तूचा नक्कीच उपयोग होईल असे प्रतिपादन केले. ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा पुणे जिल्ह्याचे उप जिल्हाधिकारी जगताप यांनी देखील सक्षम नागरीक निर्मितीसाठी शिक्षण व आरोग्य या प्रमुख बाबींवर पालकांनी लक्ष देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष येवले यांनी तर आभार सुभाष कोरडे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या