'रांजणगाव देवस्थानने केलेल्या कामांची चौकशी करावी'

No automatic alt text available.

रांजणगाव गणपती, ता. 26 फेब्रुवारी 2018: रांजणगाव देवस्थानच्या विश्वस्तांनी केलेल्या कामांची चौकशी धर्मादाय आयुक्तां मार्फत करावी, असा कौल वाचकांनी www.shirurtaluka.com वर दिला आहे.

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट रांजणगाव गणपती देवस्थानमध्ये गेली 15 ते 20 वर्षे कार्यरत असणाऱया सेवकांच्या विविध मागण्या करिता तसेच विश्वस्तांच्या बेकायदेशीर मनमानी कारभाराच्या विरोधात सहधर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे यांच्या समोर भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखली धरणे आंदोलन करणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हा संघटनमंत्री बाळासाहेब भुजबळ यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली होती. या पत्रकामधील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे होत्याः
1) शैक्षणीक पात्रता नसतानाही व देवस्थानमध्ये गैरकृत्य करणाऱया व्यवस्थापकाला त्वरीत कामावरून कमी करण्यात यावे.
2) देवस्थान व समाजाची फसवणूक करणारे विश्वस्त मंडळ त्वरीत बरखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा.
3) गेली तीन वर्षे विश्वस्तांनी केलेल्या सर्व कामाची चौकशी धर्मादाय आयुक्त यांच्या मार्फत करण्यात यावी.
4) सेवकांना त्वरीत सन 2016 पासून पगार वाढ लागू करण्यात यावी.


शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.com या संकेतस्थळाने 19 ते 25 फेब्रुवारी दरम्यान मतचाचणी घेतली होती. यावेळी वाचकांनी 100 टक्के मत नोंदवत धर्मादाय आयुक्तामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. संकेतस्थळावर घेण्यात आलेली मतचाचणी पुढीलप्रमाणे-

रांजणगाव देवस्थानच्या विश्वस्तांनी केलेल्या कामांची चौकशी धर्मादाय आयुक्तां मार्फत करावी?
होय - 100 टक्के
नाही - 0 टक्के
माहित नाही - 0 टक्के

संबंधित बातम्याः

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या