शिक्रापूर-चाकण व पाबळ चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच

Image may contain: sky and outdoor

शिक्रापूर,
ता.२७ फेब्रुवारी २०१८ (प्रा.एन.बी.मुल्ला) :
शिक्रापूर येथील चाकण चौकात व पाबळ चौकात वाहतुकीची कोंडी होउन नेहमीच वाहतुक ठप्प होत आहे.चाकण चौकातील ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेचा तर नेहमीच बोजवारा उडालेला असतो.

गेल्या दोन दिवसात तर शिक्रापूर पासून सणसवाडी पर्यंत वाहतूक कोंडी होवून सुमारे 4 किमी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे प्रवासी, वाहतुकदार व परीसरातील नागतीकांना तासनतास ताटकळत थांबावे लागल्याने मोठया प्रमाणात मनस्ताप झाला.

पुणे-अहमदनगर महामार्गावर भरधाव वेगाने वाहने असतात. चाकण, रांजणगाव गणपती व सणसवाडी औद्योगिक क्षेत्रामुळे चाकण–शिक्रापूर मार्गावरुन अवजड वाहनांची वाहतुक सुरू असते. शिक्रापूर–चाकण मार्ग हा मुंबर्इला जाण्यासाठी जवळचा बायपास मार्ग असल्याने सोलापूर महामार्गावरील मुंबर्इच्या दिशेने जाणारी व येणारी मालवाहू वाहने चौफुला – न्हावरा – तळेगाव ढमढेरे – शिक्रापूर –चाकण या मार्गानेच जात असल्याने शिक्रापूर येथील चाकण चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते व वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात तर मध्येच कांही वाहने आडवी तिडवी आल्याने वाहतुकीचा खोळंबा होउन ताटकळत थांबावे लागते.भरीत भर म्हणून उस वाहतुक ट्रॅक्टर–ट्रेलरमुळे वाहतूक कोंडीत वाढच होत आहे.

वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस असतात. परंतु, वाहनांच्या गर्दीमुळे पोलीसांनाही वाहतुक कोंडी रोखता येत नाही, अशीच स्थिती येथील पाबळ चौकातही होत आहे. मोठया प्रमाणात होणा-या या वाहतुक कोंडीमुळे अपघातग्रस्त रूग्णांना रूग्णवाहीकेतून पुण्याला नेताना प्राणदेखील गमवावे लागण्याचे प्रकार यापूर्वी झाले आहेत. प्रशासनाने या बाबींचा गांभीर्याने विचार करून पुणे–नगर मार्गावरील शिक्रापूर येथील चाकण चौक व पाबळ चौकातील वाहतुक सुरळीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी येथील चाकण चौकातील सिग्नल यंत्रणा सुरळीत चालू ठेवण्याची व पाबळ चौकात ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या