शांतीवन देशासाठी रोलमॉडेल ठरावे: सुनंदाताई पवार

बीड, ता.२७ फेब्रुवारी २०१८ (सतीश केदारी) : कायम दुष्काळी अशा दुर्गम भागात शांतीवनच्या माध्यमातुन वंचित ऊपेक्षीत अनाथ मुलांच्या पुनर्वसनाबरोबरच शेतक-यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी मनोबलच्या माध्यमातुन ऊभारलेले काम केवळ राज्यासाठीच नाही तर देशासाठी दीपस्तंभ ठरणार असल्याचे प्रतिपादन बारामती अँग्रीकल्चर डेव्हलपमेंटच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी केले.

आर्वी (जि.बीड) येथील 'शांतीवन' या सामाजीक प्रकल्पाच्या वतीने बाबा आमटेंच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या नऊ वर्षांपासुन सामाजिक क्षेञातल्या व्यक्तीमत्वांचा गौरव करण्यात येतो.सामाजीक क्षेञात समर्पित जिवन जगणाऱ्या तीन व्यक्तींना बाबा आमटे स्मृती समर्पित जीवन पुरस्कार, बाबा आमटे स्मृती जिवन गौरव पुरस्कार व बाबा आमटे स्मृती सामाजीक पुरस्कार देण्यात येत असतात. यावर्षी हे पुरस्कार अनुक्रमे आनंदवनातील बाबा आमटेंचे सहकारी सुधाकर कडु, दिशा परिवार पुणेचे राजाभाऊ चव्हाण व देणे समाजाचे या ऊपक्रमाच्या प्रमुख व प्रणेत्या वीणा गोखले यांना प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदवनचे विश्वस्त श्री. नरेंद्रजी मेस्ञी हे होते तर सुनंदाताई पवार व राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष श्री. प्रवीण घुगे यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणुन सामाजीक कार्यकर्त्या सविताताई व्होरा, लोकसत्ताचे ज्येष्ठ पञकार सुहास सरदेशमुख, दगडू लोमटे, सुरेशकाका जोशी, अभय मुलाटे, सरपंच भारतीताई भोसले संतोष गर्जे, शिवराम घोडके, मैञ मांदीयाळीचे श्री. अजयदादा किंगरे यांची ऊपस्थिती होती.

बारामती परिसरात आम्ही याच पद्धतीने पाणी आडवा, जिरवा व साठवुन ठेवा हे सुञ वापरुन जिरायतीची बागायती केली आहे. महिलांच्या बचत गट ऊत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भिमथडी सारखे प्रयोग आम्ही राबवत आहोत. याच पद्धतीने या भागात शांतीवनच्या माध्यमातुन काम ऊभे राहत आहे. शेततळ्यांच्या माध्यमातुन या ठिकाणी ऊभे राहिलेले काम क्रांती करणारे आहे. हे सारे काम बघुन आपण भारावुन गेल्याचे सांगतानाच भविष्यात आपण या कामाच्या पाठिशी खंबीर राहणार असल्याचे सांगितले.

राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी मुलांसाठी चालणा-या संस्थांसंदर्भात ऊहापोह करतांना चुकीचं काम करणाऱ्या संस्थांसंदर्भात मंञी पंकजा मुंडेंनी कसे कठोर निर्णय घेतले ते सांगुन शांतीवन ही ऊपेक्षीत मुलांच्या संगोपणासंदर्भात राज्यातील आदर्श संस्था असल्याचे सांगीतले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष दत्ता नलावडे यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेतला. पुरस्कारप्राप्त वीणा गोखले, राजाभाऊ चव्हाण, सुधाकर कडु यांची मनोगताची मन हेलावणारी भाषणे झाली तर दगडू लोमटे, सुहास सरदेशमुख यांनी मनोगते  व्यक्त केली. प्रास्ताविक भाषणात शांतीवनचे संस्थापक दिपक नागरगोजे यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमीका सांगतांनाच आजपर्यंतच्या सामाजीक प्रवासाचा आढावा घेवुन मान्यवरांनी शांतीवनच्या पाठिशी यानंतरही खंबीर रहावे असे आवाहन केले.

कार्यक्रमासाठी राज्यभरातुन सामाजीक क्षेञात काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांची मोठी ऊपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुञसंचालन सुरेश साळुंके यांनी केले तर सेवाश्रमचे सुरेश राजहंस यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या