रोटरीच्या माध्यमातून स्पोर्टस् अकॅडमी सुरु करणार

Image may contain: 10 people, people smiling, people standing
तळेगाव ढमढेरे
,
ता.२८ फेब्रुवारी २०१८ (प्रा.एन.बी.मुल्ला) :
शिरूर तालुक्यातील खेळाडू साठी स्पोर्ट्स अकॅडमी सुरु करण्यासाठी रोटरीचे योगदान राहील असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गायकवाड यांनी केले.

शिक्रापूर (ता.शिरुर) येथे शिरूर तालुका क्रीडा शिक्षक संघटना, शिरूर तालुका कलाशिक्षक संघ, शिरूर-हवेली माध्यमिक शिक्षक संघ, शिरूर तालुका पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभा, रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर, फाईट क्लब ऑफ आयडियल, शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ, श्री सिध्दीविनायक पब्लिक स्कूल शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने  क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्र शासनचा धनुर्विद्येतील  शिवछत्रपती पुरस्कार विजेता स्वप्नील ढमढेरे याचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मश्चिन्द्र गायकवाड होते.यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात मान्यवरांच्या  हस्ते स्वप्निल ढमढेरे याचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ  देवून गौरव करण्यात आला.

त्याच बरोबर स्वप्निलचे प्रशिक्षक रणजित चामले यांना उत्कृष्ठ मार्गदर्शक, धनुर्विद्या राज्य संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर यांनाही उत्कृष्ठ संघटक तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे तायक्वांदो मार्गदर्शक प्रवीण बोरसे यांना उत्कृष्ठ तायक्वांदो मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल यांनाही गौरविण्यात आले. 

कार्यक्रमाचे संयोजन प्रकाश घोलप व फाईट क्लब ऑफ आयडियल शिक्रापूर च्या सदस्यांनी केले. यावेळी अभिजित दळवी, शुभांगी दळवी, प्राचार्य रामदास थिटे, सुनील भांडवलकर, प्रवीण जगताप, अनिल पलांडे, सोमनाथ भंडारे, निखिल वाव्हळ, संपत धायरकर, पुणे क्राईम ब्रँचचे ए.एस.आय. दत्तात्रय गिरमकर, दादासाहेब उदमले, प्राचार्य बाबुराव साकोरे, प्रकाश घोलप, शिक्षक परिषदेचे तालुका कार्याध्यक्ष प्रा. एन. बी. मुल्ला, नंदकुमार शहाणे, राजाराम गायकवाड ,अमेय काळे, निखिल  वाव्हळ आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबूराव साकोरे यांनी केले, संतोष खताळ यांनी सूत्रसंचालन केले तर  धीरज दंडवते यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या