चांडोहला महिलांवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न

Image may contain: one or more people, people standing, grass, outdoor and nature
चांडोह, ता. २८ फेब्रुवारी २०१८ (सुभाष शेटे) : चांडोह परिसरात बिबट्याच्या दर्शनाने शेतातील महिलांना काम करणेही अवघड होउन बसले आहे.

सविस्तर असे कि,चांडोह येथील संपत चापुडे  यांच्या शेतात कांदा खुरपणी करीत  असलेल्या महिलांच्या उसाच्या शेतातून डरकाळी फोडत अचानक बिबट्या बाहेर आला.या वेळी सर्व महिलांची घाबरगुंडी उडाली. बिबट्यास पाहून महिलांनी घराच्या दिशेने पळ काढला.

या घटनेची माहिती क्षणार्धात गावात पोहचताच शेतमालक व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. चांडोह परिसरात आता  दिवसाही काम करणे अवघड बनले असल्याचे सांगत वनविभागाने तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या