खाजगी कारखान्याच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय

शिक्रापूर, ता. २८ फेब्रुवारी २०१८ (शेरखान शेख) :  जातेगाव  येथील खाजगी साखर कारखान्याच्या सोयीसाठी या भागातील तब्बल २२ गावांमध्ये घोडगंगा साखर कारखाना शेतकऱ्यांकडून ऊस उचलला जात नसल्याची तक्रार घोडगंगा साखर कारखान्याचे शासन नियुक्त संचालक अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी साखर संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांचेकडे केली असून याबाबत तातडीने चौकशी करुन कार्यवाहीची ग्वाही डॉ. तोष्णीवाल यांनी दिली.

याबाबत सुरेश पलांडे यांनी सांगितले की रावसाहेबदादा पवार सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातच आठ वर्षांपूर्वी व्यंकटेशकृपा शुगर मिल्स हा खाजगी साखर कारखाना सुरू झाला आणि शिरुर तालुक्यातील सहकारी व खाजगी असा राजकीय संघर्ष सुरू झाला. त्यातूनच काही मुद्द्यांच्या अधारे थेट साखर संचालकांकडे नुकत्याच तक्रारी करण्यात आल्या असून तक्रारीच्या अनुषंगाने तातडीने चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे डॉ. तोष्णीवाल यांनी सांगितले आहे. दरम्यान एकुण सर्व तक्रारींतील प्रमुख तक्रार म्हणजे व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या कारखान्याच्या साधारण १५ ते २० किलोमिटरच्या परिसरात घोडगंगाकडून ऊस उचलला जात नसल्याचे सांगण्यात आले असून यातील बहुतेक गावांची ऊस उत्पादन क्षमता साधारण ५० ते ७० हजार टन एवढी आहे.

यातील आक्षेप असलेली गावे आणि त्यांचेकडून या गाळप हंगामात दि.बाविस फेब्रुवारी पर्यंत गाळप झालेल्या ऊसाचे क्षेत्र पुढील प्रमाणे.

जातेगाव बुद्रुक (२६४ टन), मुखई (१२०० टन), हिवरे (६२ टन), कासारी (९३ टन), जातेगाव खुर्द (१३०० टन), सणसवाडी (३२४ टन), कोंढापूरी (१३००), शिक्रापूर (११०० टन), दरेकरवाडी (२५०० टन), निमगाव म्हाळूंगी (३००० टन), कोरेगाव भिमा (३०० टन), करंदी (१३०० टन), तळेगाव-ढमढेरे (१८ हजार टन ), डिंग्रजवाडी (३५०० टन ), पिंपळे-जगताप (१७७ टन), वढु बुद्रुक (४००० टन ), वाजेवाडी (१९८ टन), आपटी (११०० टन), बुरूंजवाडी (३३६ टन), धानोरे (१५०० टन), टाकळी भिमा (१२०० टन), पिंपळे धुमाळ (०० टन) या शिक्रापूर परिसरातील शेतकरी यांना घोडगंगा साखर कारखानाकडून नाहक त्रास दिला जात असून यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी सुरेश पलांडे यांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या