मराठी भाषेचा ठेवा जपणे काळाची गरज : परदेशी

भांबर्डे,ता.२८ फेब्रुवारी २०१८(प्रा.एन.बी.मुल्ला) : मराठी भाषेचा ठेवा जपणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मराठी भाषेचे अभ्यासक संतोष परदेशी यांनी केले.
भांबर्डे (ता. शिरुर) येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये  आयोजित मराठी राजभाषा दिनाचे कार्यक्रमात संतोष परदेशी  बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की आज वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मराठी दिन जगभर साजरा होत आहे ,आज मराठी भाषेचे महत्व समजणे गरजेचे आहे. प्रत्येक मराठी भाषिकाने त्याचा अभिमान बाळगावा. यावेळी कुसुमाग्रजांचे नटसम्राट नाटकातील त्यांनी संवाद सादर केला व तरुणांना प्रेरणा देणारी त्यांची 'कणा' कविताही सादर केली. तसेच मराठी भाषेचे महत्व विशद केले. वाचनाची आवड विद्यार्थ्यांनी बाळगणे गरजेचे आहे. तसेच मराठी साहित्यिकांची साहित्याचे जास्तीत जास्त वाचणे करून त्यातून भरपूर ज्ञान  संपादन करता येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अनेक कवींच्या कविताही सादर केल्या.

या कार्यक्रमास शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम , बालाजी खराटे, सविता शिंदे, उत्तम गाडे, लालासाहेब जगताप, विठ्ठल जगदाळे, नानासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती कदम यांनी केले.सुरेश शेळके यांनी सूत्रसंचालन केले तर बाळासाहेब दिवेकर यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या