सादलगाव ग्रामपंचायत शंभर टक्के गटारमुक्त

सादलगाव,ता.१मार्च २०१८ (संपत कारकूड) : गावातील सांडपाण्यामुळे गावच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी गेली चाळीस वर्षांपासून प्रयत्न करीत असलेल्या सादलगाव ग्रामपंचायतीला 14 व्या वित्त आयोगामुळे बळकट मिळाली असून गाव शंभर टक्के गटारमुक्तीकडे वाटचाल करीत असल्याने गावच्या विकासकामांना वेग आला आहे.

ग्रामपंचायती बळकटीकरणासाठी शासनाने घेतलेल्या म्हत्वकांक्षी निर्णयातून 14 व्या वित्त आयोगात गावांना थेट मिळणा-या निधीतून गावामध्ये सध्या मोठया प्रमाणात विकासकामे होत असून ग्रामपंचायत सध्या हळुहळु बाळसे धरीत आहे. सन 2017-18 साठी सुचविलेल्या कामांपैकी निवडक कामांवर सध्या निधी खर्च केला जात आहे. गावातील गटारलाईनचे राहिलेले फाटे मुख्य गटार लाईनला जोडण्याच्या फाटयाचे भुमिपुजन ग्रामपंचायतीच्या वतीने स्थानिकांकडुन नुकतेच करण्यात आले.हे काम पुर्ण झाल्यानंतर गावातील गटारलाईन पुर्णत्वाकडे जात आहे.

2017-18 च्या आर्थिक विकासयोजनांमधील खर्चाचा प्रस्तावित तिसरा हप्ता ग्रामपंचायतीकडे वर्ग झाला असून त्याचाच एक भाग म्हणुन अंतर्गत गटारलाईन फाटयाचे काम करण्यात येणार असल्याचे उपसरपंच अविनाष पवार, सदस्य देविदास होळकर यांनी सांगितले. त्याचबरोबर 30 गरोदर महिलांसाठी साडीवाटप व सकस आहार यासाठीही अनुदान खर्च करण्यात येणार आहे. या सर्व विकासकामांमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या