तळेगाव ढमढेरेतील स्मारकाजवळ आढळला मृतदेह

शिक्रापुर,ता.१ मार्च २०१८(प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक जवळ अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी बाबुराव यदलापुरे हे पाणी पुरवठा टाकीजवळ गेले असताना त्यांना तेथील लोकांनी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक जवळच्या कट्ट्याजवळ एक इसम मयत अवस्थेत पडला असल्याचे सांगितले, त्यावेळी त्याने जवळ जाऊन पहिले असता तेथे एक इसम पडलेला होता. त्याच्या बाबत आजूबाजूला चौकशी केली असता काहीही माहिती मिळू शकली नाही.याबाबत बाबुराव होसन आप्पा यदलापुरे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता त्या पुरुषाचे वर्णन हे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, रंग काळा सावळा, अंगात हिरवट शर्ट व निळी जीन्स, केस काळी पांढरी असे आहे.

या इसमा बाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ०२१३७ २८६३३३ तसेच ९२८४३५९७०१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगदाळे हे करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या