शिरुर शिक्षक-पालक संघाने दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

शिरुर,ता.१ मार्च २०१८(अभिजित आंबेकर) : शिरुर शहरातील विद्याधाम प्रशालेत माध्यमिक परिक्षेसाठी बसणा-या विद्यार्थ्यांना शिरुर शिक्षक पालक संघ व शिरुर शहर पञकार संघाने गुलाबपुष्प व पेन देउन शुभेच्छा दिल्या.

आज गुरुवार(दि.१) पासुन दहावीच्या परिक्षेस सकाळी सुरुवात झाली.तत्पुर्वी विद्यार्थ्यांच्या मनात परिक्षेविषयी असणारी धाकधुक कमी व्हावी, तणावमुक्त वातावरणात परिक्षा व्हावी या साठी शिरुर शहरातील शिक्षक पालक संघ व शिरुर शहर पञकार संघाने विद्याधाम प्रशालेतील विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पेन देउन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी शुभेच्छा दिली.दहापासुन विद्यार्थ्यांनी शिरुर शहरासह तालुक्यातील विविध परिक्षा केंद्रावर गर्दी केली होती.

या प्रसंगी अॅड.रविंद्र खांडरे, सुनिल चाबुकस्वार, जितेंद्र खांडरे, पोलीस नाईक प्रल्हाद सातपुते, पुष्पराज कोळपकर, सखाराम फंड, प्रविण मुथा, शेखर गुजर, वैभव मराठे, निमोण्याच्या सरपंच जिजाताई दुर्गे, यशस्विणीच्या नम्रता गवारी, डॉ.वैशाली साखरे, डॉ.भगत, नगरसेवक विठ्ठल पवार, नगरसेविका ज्योती लोखंडे, संजय पोळ,कैलास भोसले, प्रकाश पवार, शिरुर शहर पञकार संघाचे अध्यक्ष सतीश धुमाळ, अभिजित आंबेकर, शिरुर तालुका डॉट कॉम चे कार्यकारी संपादक सतीश केदारी, यांसह भारती बारवकर,अर्पणा बेंद्रे, शारदा भुजबळ, नसिम सय्यद, प्रा.धनाजी खरमाटे, रमेश जाधव, प्रा.जी.टी.दळवी, प्रा.शेळके यांसह शिरुर शहरातील नागरिक उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या