शिरूरमध्ये गरजूंसाठी मोफत तिरळेपणा शस्ञक्रिया शिबीर

शिरुर, ता.२ मार्च २०१८ (मुकुंद ढोबळे) : मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल येथे गरजूंसाठी मोफत तिरळेपणा शस्ञक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक डॉ. भुषण सोमवंशी यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना सोमवंशी सांगितले कि, रसिकलाल धारिवाल संचलित मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल,शिरुर येथे गेल्या चौदा वर्षात गरजु रुग्णांसाठी सातत्याने आरोग्य सेवा पुरविल्या जातात.तसेच सामाजिक व आर्थिक सुविधांचा लाभ गरुजुंना मिळत आहे.

रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांनी २० वर्षे आर एम  धारिवाल फौंडेशनच्या माध्यमातुन असंख्य लोकोपयोगी कामे करुन समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रचंड कामगिरी केली.शिक्षण,आरोग्य, पर्यावरण,सामाजिक, धार्मिक, क्षेञात तसेच नैसर्गिक आपत्तीत धारिवाल यांनी मोलाचे योगदान दिले आहे.स्वर्गीय रसिकलाल धारिवाल यांची जयंती(१मार्च) रोजी असुन त्यानिमित्ताने (दि.२ ते ४ मार्च) दरम्यान शिरुर शहर व तालुक्यातील गरजुंसाठी तिरळेपणा शस्ञक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबिराचा जास्तीत जास्त गरजुंनी लाभ घ्यावा असे आवाहन मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या