कर्ता पुरुष रुग्णालयात तर पत्नीला हदयाचा आजार...

Image may contain: 1 person, closeupकवठे यमाई, ता. 2 मार्च 2018 (सुभाष शेटे): येथील अत्यंत गरीब कुटुंबातील दत्तात्रेय बबन गोसावी हे फुफुसात झालेल्या संसर्गामुळे पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. मोलमजुरी करण्याबरोबरच घरची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावरच. अशा परिस्थितीत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कोलमडली असून, त्यांनी अर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

याबाबत रघुनाथ व नवनाथ गोसावी यांजकडून मिळालेल्या माहिती नुसार, कवठे येमाई येथील अतिशय गरीब कुटुंबातील दत्तात्रय बबन गोसावी (वय ४३) हे फुफुसात झालेल्या संसर्गामुळे गेल्या १०/१२ दिवसांपासून आजारी आहेत. उपचारासाठी त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नातेवाईकांनी दाखल केले आहे. उपचारासाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे समजल्याने जेमतेम १५ वर्षांचा शिकत असलेला त्यांचा मुलगा व हृदयाच्या आजाराने ग्रस्त असलेली त्यांची पत्नी सरीता हतबल झाले आहेत.

नातेवाईकांनीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या दत्तात्रय गोसावी यांना जेमतेम १९ गुंठे जमीन आहे. प्रामाणिकपणे काम व मोलमजुरी करून प्रापंचिक चरितार्थ चालविणारे विनम्र स्वभावाचे दत्तात्रय गोसावी यांना कुठलाच आधार नसल्याने व घरचा कर्ता माणूसच असलेले दत्तात्रय गोसावी हे आजाराच्या संकटातून बरे होऊन त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा म्हणून समाजातील दानशूर व्यक्तीनी उपचारासाठी गोसावी कुटुंबाला मदतीचा हात देण्याची गरज पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, सरपंच दीपक रत्नपारखी, मिठूलाल बाफणा व ग्रामस्थांनी केली आहे.

गोसावी यांना दररोज हजारो रुपयांची औषधे करावी लागतात. रहायला साधे घरही नाही. हातावरचे पोट असलेले कुटुंब एवढा पैसा आणणार कोठून? समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत केल्यास हे कुटुंब नक्कीच उभारी घेऊ शकेल.

दत्तात्रेय गोसावी यांना उपचारासाठी आर्थिक मदत करू इच्छिणा-या व्यक्तींनी ७७७००८८७२६ व नवनाथ गोसावी - ९५५२१५९५५३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
 
आर्थिक मदत पाठविण्यासाठी-

दत्तात्रेय बबन गोसावी, सिंडीकेट बॅंक शाखा कवठे, खाते क्रमांक - ५३३०२२०००२७८७०, आय एफ एस सी कोड - एस वाय एन बी ०००५३३० या खाते क्रमांकावर मदत पाठवावी असे आवाहन कवठें येमाई ग्रामस्थानी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या