जन्मदात्या पित्यानेच कापला पोटच्या मुलीचा गळा

शिरुर,ता.३ मार्च २०१८(प्रतिनीधी) : अवघ्या सात महिन्याच्या पोटच्या मुलीचा धारदार शस्ञाने खुन करुन विहिरीत फेकुन देउन मुलगी बेपत्ता असल्याचा बनाव करणा-या क्रुरकर्मा पित्याला शिरुर पोलीसांनी खुनाचा शोध घेत अवघ्या पाच तासांत अटक करण्याची कामगिरी केली.या प्रकरणाने आरोपीचे क्रौर्य जगासमोर आले आहे.
या प्रकरणात कौशल्या भुरा धुळकर(वय.७ महिने) असे दुर्दैवी मृत्यु झालेल्या मुलीचे नाव आहे तर भुरा शंकर धुळकर(वय.३०, रा.जळगाव) यास पोलीसांनी अटक केली आहे.राञी उशिरापर्यंत शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी-आंधळगाव हद्दीतील शेतात उसतोड करणा-या कुटुंबातील एक मुलगी बेपत्ता झाली होती.याबाबत बेपत्ता कुटुंबातील सदस्यांनी मांडवगण पोलीस स्टेशन येथे धाव घेउन याबाबत पोलीसांना माहिती दिली.दरम्यान शुक्रवार(दि.२) रोजी आंधळगाव हद्दीतील एका विहिरीत सात महिन्याच्या मुलीचा मृतदेह तरंगताना आढळुन आला होता.यानंतर मांडवगण फराटा व शिरुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तो मृतदेह बेपत्ता मुलीचाच असल्याचे निदर्शनास आले.यावेळी पोलीसांनी बारकाईने मृतदेहाची पाहणी केली असता मुलीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आले.

या घडलेल्या प्रकाराबाबत शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी तातडीने तपासाची सुञे हाती घेत पोलीस तपास पथकाच्या साहाय्याने माहिती गोळा करण्यास  सुरुवात केली.यावेळी मुलीच्या वडीलांकडे माहिती विचारली असता बोलण्यात विसंगती आढळुन आली.त्यामुळे पोलीसांनी खाक्या दाखवताच खरा प्रकार आरोपीने घडाघडा कथन केला.या वेळी माहिती देताना सांगितले कि, पत्नी व माझ्यात भांडण झाल्याने ती काही दिवस माहेरी होती.त्यामुळे हि असलेली मुलगी पोटची नसल्याचा संशय होता.त्यामुळे बुधवारी मध्यराञी च्या सुमारास मुलीला झोपेतुन उठवुन जवळ घेउन स्वत:जवळील असणा-या धारदार शस्ञाने मुलीचा गळा चिरला.यावेळी मध्ये मारु नका असे ओडणा-या पत्नीस झिडकारत 'तुला मारुन टाकेल' अशी धमकी दिली. व त्या मुलीचा मृतदेह जवळील विहिरीत नेउन टाकला.यानंतर गुरुवारी पोलीस स्टेशन ला जात मुलगी बेपत्ता असल्याचा बनाव केला.

या सर्व प्रकरणात अवघ्या पाच तासांत खुनाचे प्रकरण उघडकिस आणत आरोपीला तत्काळ ताब्यात घेण्याकामी शिरुर पोलीसांना यश आले.या मध्ये  अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.संदिप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक भिमगोंडा पाटील, पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, शिरुर तपास पथकातील गुरु जाधव, उमेश भगत, जनार्दन शेळके, महिला पोलीस कर्मचारी उषा अनारसे, विदया बनकर, आबासाहेब जगदाळे, संतोष औटी, गणेश आगलावे यांनी मोलाची भुमिका  बजावली तर आंधळगाव चे पोलीस पाटील उर्मिला कुसेकर यांनी पोलीसांना सहकार्य केले.

शिरसगाव काटा येथील प्रकरणाला आठ दिवसही झाले नाही तोच पुन्हा खुन प्रकरण घडल्याने पोलीसांना हे एकप्रकारे आव्हान ठरले होते.परंतु शिरुर पोलीसांनी वेगाने तपास करत पाचच तासांत आरोपीला अटक केल्याने नागरिकांनी शिरुर पोलीसांचे या कामाबदद्ल अभिनंदन केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या