राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षांची अशीही माणुसकी...

Image may contain: 4 people, people sitting
न्हावरे, ता. ४ मार्च २०१८(प्रतिनीधी) : मानलेल्या भावाच्या वाढदिवसाला येण्याचे वचन दिल्यानंतर येउ न शकल्यानंतर त्या भावाची भेट घेउन 'त्या' राष्ट्रवादीच्या पुणे महिला शहराध्यक्षांनी स्वत:च्या घरी नेत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

पुणे जिल्हयातील शिरुर तालुक्यातील न्हावरे येथील सुदर्शन जगदाळे हा राष्ट्रवादीचा अगदी सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता. सुदर्शन जगदाळे यांनी एक कोटी अजित पवार समर्थक या फेसबुक ग्रुप च्या माध्यमातुन राज्यभरातील लाखो युवक, नेते कार्यकर्त्यांना जोडले आहे.त्यांच्या याच कार्याची माजी उपमुख्यमंञी अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह अनेकांनी दखल घेतली आहे.त्यांना राष्ट्रवादीचे सोशल मिडियाचे राज्याचे पद हे दिले आहे.

सुदर्शन जगदाळे यांना एका अपघातात इजा झाल्याने स्वत:च्या शरीराचा काही भाग व्यवस्थित काम करत नाही.तरीही ते या प्रचंड दु:खावर काम करत जोमाने काम करत आहेत.गेल्या महिन्यात वाढदिवस होता.या वाढदिवसाला येण्याचे राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षा रुपालीताई चाकनकर यांनी वचन दिले होते परंतु काहि कामानिमित्त त्या येउ शकल्या नाही.अखेर दोन दिवसांपुर्वी त्यांनी स्वत: सुदर्शन जगदाळे यांची  भेट घेत जगदाळे यांना पुणे येथील घरी नेउन अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजराही केला.

या निमित्ताने राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षांच्या माणुसकिचा प्रत्यय आला.तर सुदर्शन जगदाळे यांनीही हा आनंद आजवर कधीही अनुभायला मिळाला नसल्याचे संकेतस्थळ www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या