शिक्रापूर येथील वेळ नदीवरील बंधारे कोरडे ठाक

तळेगाव ढमढेरे, ता. ४ मार्च २०१८ (प्रा. एन.बी. मुल्ला) :तळेगाव ढमढेरे–शिक्रापूर येथील वेळ नदीवरील बंधारे कोरडे पडल्याने पाण्याची भिषण समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चासकमानचे पाणी डाव्या कालव्याबरोबरच वेळ नदीतून सोडण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.तळेगाव ढमढेरे येथील भैरवनाथ बंधारा तसेच शिक्रापूर येथील कोल्हापूर पध्दतीचा बंधारा कोरडा पडला आहे.चासकमानचे आवर्तन वेळेवर सोडले तरच वेळ नदीला पाणी सुटते व बंधारे भरले जातात.गेल्या आठ दिवसापासून वेळ नदीवरील बंधारे कोरडे पडले आहेत.तळेगाव ढमढेरे येथील नळ पाणी पुरवठा योजना भैरवनाथ बंधा-यावर अवलंबून आहे.मात्र बंधा-यातच पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याची तसेच दुय्यम वापरासाठी आवश्यक पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

बंधारा भरल्याळनंतर सुमारे महिणाभर पाण्याचा प्रश्न सुटतो.पिण्याच्या पाण्याची समस्या तर तळेगावकारांच्या पाचवीलाच पुजलेली आहे.ब-याच वेळा येथील नागरीकांना पिण्याचे पाणी विकतच घ्यावे लागते.शिक्रापूर येथील नळपाणीपुरवठा योजना देखील वेळ नदीवरील भैरवनाथ बंधारा व येथील विहीरीवर अवलंबून आहे.सध्या येथील ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा सुरू आहे.मात्र पाण्याच्या टंचार्इमुळे येथे देखील पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे वेळ नदीतून चासकमानचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे. वेळ नदीतून चासकमानचे पाणी सोडल्यास किमान महिणाभराचा पाण्याचा प्रश्न सूटणार असून नदी काठच्या गावांना शेतीसाठी देखील हे पाणी उपयुक्त ठरणार आहे.धरणातील उपयुक्त पाण्याच्या साठयाचा विचार करता चालू वर्षी भिषण दुष्काळी परीस्थिती व पाणी टंचार्इस सामोरे जावे लागणार असल्याने पिण्याच्या पाण्यास प्राधान्य देवून वेळ नदीवरील बंधारे नियोजनबध्दरीत्या ठरावीक कालावधी नंतर भरून घ्यावेत अशी मागणी देखील परीसरातील नागरीकांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या