गावच्या मातीचे ऋण कदापी विसरणार नाही: जाणकर

Image may contain: 9 people, people smiling, people sitting
न्हावरे, ता.४ मार्च २०१८ (संजय बारहाते) : राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन करण्यापुर्वी गावाकडील वाड्या-वस्त्यांवरील जनतेने भरभरुन प्रेम करत केलेली मदत मी कदापी विसरणार नसल्याचे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी बोलताना सांगितले.

उरळगाव (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध पैलवान चांगदेव नामदेव होलगुंडे यांचे निधन झाले. त्यांच्या कुंटुबियांचे सांत्वन करण्यासाठी जानकर त्यांच्या घरी आले होते.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले कि, कुस्ती क्षेत्रामधे पैलवान चांगदेव होलगुंडे यांनी राज्यात नावलौकीक मिळून कुस्ती क्षेत्राला संजीवनी मिळून देण्यांचे काम केले.

यावेळी पैलवान चांगदेव होलगुंडे यांची मुले चंद्रकांत होलगुंडे, अंकुश होलगुंडे, हनुमंत होलगुंडे यांना भेटून सांत्वन केले. यावेळी शिरूर तालुका रासपाचे अध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे, प्रभाकर जांभळकर, रामकृष्ण बिडगर, अरुण कोळपे, काळुराम पुणेकर, भिमराव थोरात, संतोष इंगळे, भागवत कोळपे, बाबासाहेब चोरमले, भानुदास होलगुडे, बापुराव पांडोळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Image may contain: 12 people, including Punamchand Bhujbal, people smiling, people standing and outdoor

याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधत मंत्री जानकर यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.राष्ट्रीय समाज पक्ष स्थापनेच्या पुर्वी न्हावरे, ऊरळगाव परिसरात धनगरांच्या वाडयावर शेतात झोपायचो, येथील मित्रांच्या गाडीवर बसुन वाडी वस्तीवर फिरायचो, याच भुमीच्या आठवणी ना जानकर साहेबांनी पुन्हा होलगुंडे यांच्या शेतात मांडी घालुन सुमारे तासभर उजाळा दिला. येथील जनतेने केलेली मदत आयुष्यात कितीही मोठा झालो तरी विसरणार नाही असे त्यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या