आकांक्षा फौंडेशनतर्फे महिलादिनानिमित्त व्याखानाचे आयोजन

शिरूर, ता.४ मार्च २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर येथील आकांक्षा फौंडेशन या विशेष मुलांच्यासंस्थेतर्फे  बुधवारी  संस्थेचा वर्धापनदिन व जागतिक महिलादिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिरुर येथील रामलिंग रोड नजीक आकांक्षा एज्युकेशनल फौंडेशन हि संस्था विशेष बहुविकलांग मुलांवर काम करत असुन या संस्थेला बुधवार(दि.७ मार्च) रोजी दोन वर्षपुर्ण होत आहेत.यानिमित्ताने बीड जिल्हयातील वंचित विद्यार्थ्यांसाठी, तसेच मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातुन शेतक-यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासुन काम करणा-या शांतिवन प्रकल्पाच्या संचालिका कावेरीताई नागरगोजे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहरातील देणे समाजे या उपक्रमाच्या संस्थापिका विणाताई गोखले या राहणार असुन शिरुर चे तहसिलदार रणजित भोसले यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे.

त्याचप्रमाणे संस्थेचा दोन वर्षाच्या कामाचा आढावा व विशेष मुलांचा सांस्कृतिक गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाला सर्वच क्षेञातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असुन शिरुर शहर व तालुक्यातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या