'तो' दंबग पोलीस अधिकारी सर्वसामान्यांत लोकप्रिय

शिरुर,ता.५ मार्च २०१८(प्रतिनीधी) : गुन्हेगारांवर वचक अन सर्वसामान्यांना न्याय अशा पद्धतीने काम करत वेगळया 'स्टाईल' चा अन स्वत:च्या 'कामाचा' ठसा उमटविणा-या 'त्या' पोलीस अधिकाराची तरुणाई सह सर्वसामान्यांत भलतीच लोकप्रियता असल्याचे दिसुन येते.
शिरुर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या बदलीनंतर पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांची नेमणुक झाली होती.त्यांच्याच कार्यकाळात शिरुर पोलीस स्टेशन ला अनेक चांगले अधिकारी अन कर्मचारी लाभले.त्यावेळेस महिला पोलीस उपनिरीक्षक अनिता होडगे यांनी लेडी सिंघम ची भुमिका बजावत कॉलेजच्या आवारात टवाळक्या करणा-या, रस्त्या-रस्त्यांवर मुलींची छेड काढणा-यांचा पुरेपुर  बंदोबस्त केला होता.त्यांनी महिला अन कॉलेज च्या मुलींशी चांगले नातेच प्रस्थापित केले होते.

दयानंद गावडे यांच्या कामाचा आदर्श घेत शिरुर पोलीस स्टेशनला सर्वाधिक धडक कारवाया केल्या.त्या केलेल्या कारवायांमध्ये महत्वाची भुमिका बजावली ती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे यांनी.न्हावरे फाटा येथील भिषण अपघात असो कि मांडवगण फराटा, वडगाव रासाई येथे घडलेल्या अपघातांच्या घटना.यात प्रत्येक ठिकानी संयमी भुमिका  वाघमोडे यांनीच पार पाडली.दयानंद गावडे यांच्या बदलीनंतर शिरुर पोलीस स्टेशनला सर्वाधिक दबंग अधिकारी म्हणुन सध्या नाव घेतले जातेय ते सोमनाथ वाघमोडे यांचेच.

मारहाणीचे प्रकरण असो कि कौटुंबिक कलह, जमीनीचा वाद असो कि दोन गटातील वाद. यात कायद्याच्या चौकटीत राहुनच न्याय दयायचा या भुमिकेशी ते ठाम असतात.गुन्हेगाराला केलेल्या गुन्हयाची जाणीव हाच खरंतर यामगाचा उद्देश त्यांच्या बोलण्यातुन असतो.फिर्यादी जेव्हा त्यांचे गा-हाणे,दु:ख त्यांच्याकडे घेउन जात असतो त्यावेळेस आपुलकीने चहा हा मागविला जातो त्यावेळेस संपुर्ण म्हणने काय आहे, कायदा काय सांगतो असे सांगत  समोरच्या व्यक्तीला त्यांच्या वागणुकिचा एकप्रकारे सुखद धक्काच मिळतो.

ब-याचदा  याच ठिकाणी रागारागाने आलेल्या दोन्ही गटाला शांत करण्यात यश येते व यातच दोहोंचा समेट घडतो व संभाव्य पुढील वाद टाळल्याचे अनेकदा नागरिकांनी अनुभवलेही असेल.मांडवगण फराटा व टाकळी हाजी औटपोस्ट ला काम करत असताना सर्वाधिक दारुभट्टया उद्धवस्त करणे, दारुधंदे बंद करणे, या आरोपींना कडक शिक्षा करणे यावर  त्यांनी कटाक्षाने लक्ष दिल्याने त्या-त्या भागातील सर्वसामान्य नागरिक त्यांच्या याच कामावर समाधानी असल्याचे त्या-त्या भागातील नागरिक बोलत आहेत.

४२ लाखांचा गुटखा पकडुन एक पुडीही न हालु देता त्या विभागाच्या ताब्यात देण्याची आतापर्यंतची शिरुर पोलीस स्टेशनची सर्वात मोठी कारवाई पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे यांच्याच नावावर आहे.चांगल्या माणसाला चांगली वागणुक अन गुन्हेगाराला कडक शिक्षा यामुळे शिरसगाव काटा, इनामगाव, मांडवगण फराटा, वडगाव रासाई,कुरुळी या गावांमध्ये सर्वसामान्यांची त्यांच्याविषयी आदराची भावना आजही कायम आहे.गुन्हेगारांवर प्रचंड वचक असल्याने या भागातील अवैध धंदे त्यांच्या कार्यकाळात थांबले असल्याचे अनेक नागरिक सांगत  आहेत.

पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे हे जसे कामाच्या बाबतीत सर्वसामान्यांच्या बाबतीत लोकप्रिय आहेत.त्याचप्रमाने वर्दीत राहुन प्रामाणिक कामाची सचोटी व स्वत:ची जगण्याची वेगळी शैली यामुळेही तरुणाईत लोकप्रिय आहेत.गरीब घरातुन मोठे कष्ट घेत महाराष्ट्र पोलीस सेवेत असलेल्या या अधिका-याची शिरुर तालुक्यात तरुणाईला स्टाईलची भुरळच पडली आहे.

याच आठवड्यात पोलीस भरती सुरु असल्याने अनेक तरुण या अधिका-याला भेटुन मार्गदर्शन करण्यासंबंधी विनंती करण्यास येत असल्याचे चिञ गेल्या आठवड्यापासुन पहावयास मिळत आहे.त्यांच्या कामाचा अन स्टाईलच्या बाबत  त्यांना विचारले असता, खाकी वर्दीशी प्रामाणिक राहुन सेवा करायची.माञ गुन्हा करणा-याला कदापी माफ करणार नाही.कायद्याच्या चौकटीतच राहुन प्रत्येकाला न्याय दयायचा प्रयत्न यापुढेही कायम राहणार आहे.

शिरुर पोलीस स्टेशनला दबंग अधिका-याची भुमिका गावडे यांच्यानंतर वाघमोडे यांच्याकडेच पहायला मिळत असल्याच्या चर्चा सर्वसामान्यांच्या तोंडुन ऐकायला मिळतात.

शिरुर, पारनेर,श्रीगोंदा या तीन तालुक्यातील नागरिक शिरुर शहरात येत असतात.शिरुर पोलीस स्टेशन ला सर्वाधिक तक्रारी याच भागातील येतात व त्याची दखल या पोलीस स्टेशन ला घ्यावीच लागते.शिरुर पोलीसांवर कामाचा ताण असुन ही कोणीही याची तक्रार न करता  कर्तव्य बजावत असतात.त्यामुळे नागरिकांनी पोलीसांच्या याही बाजुचा विचार करण्याची गरज आहे.

संपर्क: सोमनाथ वाघमोडे : 9594989305

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या