पिंपरखेडच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन स्पर्धेत यश

Image may contain: 17 people, people smiling, people standing

पिंपरखेड, ता.५ मार्च २०१८ (आबाजी पोखरकर) : पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय इंग्रजी अध्ययन समृध्दी स्पर्धेमध्ये पिंपरखेड च्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.

आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय इंग्रजी अध्ययन स्पर्धेत पिंपरखेडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता दुसरीच्या मुलांनी कवितागायण स्पर्धेत  उत्कृष्ट सादरीकरण करत १ ली-२ री या गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.

शिक्षणाधिकारी शैलजा दराडे सभापती उषा कानडे,गटशिक्षणाधिकारी पोपट महाजन अदि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या मुलांना मख्याध्यापक सुरेश शिंदे,सुभाष कोरडे,लहू गाजरे,दत्तात्रय चिकटे,बाळासाहेब बांबळे,विजया ताठे,रत्नमाला शेळके व वर्गशिक्षिका मधुमती गाजरे यांनी मार्गदर्शन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या