मलठणला दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

शिरुर, ता.६ मार्च २०१८ (प्रतिनीधी) : मलठण (ता. शिरुर) हद्दीत दोन दुचाकीत झालेल्या धडकेत एकाचा मृत्यु तर दोघे गंभीर जखमी  झाल्याची घटना घडली. या प्रकरणी बाबु कमाल मोमीन यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
या झालेल्या अपघातात सलमान कमाल मोमीन (वय.२४,सध्या रा.मलठण) याचा मृत्यु झाला आहे. शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलठण गावच्या हद्दीत न्यु इंग्लिश स्कुल समोर सुरज संभाजी गावडे (रा.निमगाव दुडे) याने त्याच्या मोटारसायकल नं एम.एच.१२ एच.पी.३३५४  हि घेउन संतोष पानगे यास डबल सिट घेउन भरधाव वेगाने जात असताना फिर्यादीच्या गाडीस धडक दिली.या अपघातात सलमान याचा मृत्यु झाला तर फिर्यादीसही मार लागला.तसेच गाडीला धडक देणा-या दोघांनाही गंभीर दुखापत झाली असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी शिरुर पोलीसांनी गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश कोकरे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या