शिक्रापूरला अवैध वाहतूकीला पाठबळ कोणाचे ?

Image may contain: sky and outdoor
शिक्रापूर
, ता. ६ मार्च २०१८ (धर्मा मैड) :
शिक्रापूर  येथे अवैध वाहतुकीला वाहतुक पोलीसांकडुनच प्रोत्साहन मिळत असुन या  रस्त्यावर उभा करून अवैध  प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांमुळे शिक्रापूर येथील पाबळ चौक व चाकण चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी करण्यास ही अवैध वाहने कारणीभूत ठरत असल्याची चर्चा नागरिकांत आहे.

शिक्रापूर हे पुणे व मुंबई महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असुन या ठिकाणाहून चाकण, तळेगाव दाभाडे मार्गे मुंबई ला जाणार्‍या प्रमुख द्रुतगती महामार्ग व लोणावळा महामार्गाला हा शिक्रापूर चाकण चौकातून तर पुणे शहराकडे हा रस्ता जोडला जातो. पाबळ चौकातून परिसरातील पाबळ, जातेगाव व बेट भागातील गावांमध्ये  जाणारी वाहने व शिरूर शहर, रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या कामगारांच्या बसेस व मराठवाडा, विदर्भ व अहमदनगर सह महत्वाचे शहरांकडे हजारो एस.टी.बसेस, खाजगी वाहने दररोज मुंबई, पुणे या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या शिक्रापूर या प्रमुख ठिकाणाहून जात आहे.

या सद्य परिस्थितीत या शिक्रापूर पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलिसांचे सकाळी  व संध्याकाळी या पाबळ चौक व चाकण चौकात योग्य नियोजन असणे गरजेचे आहे. परंतु  हे वाहतूक पोलीस  वाहतुक कोंडी कडे जास्त प्रमाणात लक्ष देण्यापेक्षा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना दमदाटी व कायद्याचा बडगा  दाखवून आपला खिसा भरण्याकडे जास्त लक्ष देत असल्याचे शिक्रापूर येथील पाबळ चौक व चाकण चौकातून प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांना उघडपणे दिसत आहे.

चाकण मार्गावर, पुण्याच्या मार्गावर, शिरूर शहर व अहमदनगरच्या दिशेने दररोज अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनचालकांकडून ठरलेल्या प्रमाणे आर्थिक हप्ता गोळा करण्यासाठी त्या त्या  मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला जबाबदारी ही या वाहतुक पोलिसांनी नेमून दिली असल्याची माहिती समजत आहे. या अवैध  प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांच्या मिळणाऱ्या  वरदहस्तामुळे प्रोत्साहन व सुरक्षितता मिळत असल्यामुळे भर  रस्त्यात वाहने उभी  करण्याची हिंमत या अवैधप्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची होते आहे. परिणामी या वाहनांच्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.

त्यामुळे या वाहतूक पोलिसांच्या दृष्टीकोनातून वाहतुक कोंडी महत्वाची किं मिळणारी अवैध कमाई ? याबाबत वाहतुक कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी विचार करण्याची गरज आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या