शिरूर बाजारसमितीचा ६५ टन कांदा निघाला श्रीलंकेला

Image may contain: 10 people, people smiling, people standing, outdoor and food
शिरूर, ता. ७ मार्च २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर बाजारसमितीतील चांगल्या प्रतीचा कांदा परदेशात निर्यात केला जात असल्याची माहिती बाजारसमितीचे संचालक विजेंद्र सुभाष गद्रे यांनी दिली.

शिरुर बाजारसमितीचे संचालक विजेंद्र सुभाष गद्रे यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, शिरुर बाजारसमितीच्या संचालक मंडळाच्या व व्यापारी अन शेतक-यांच्या प्रयत्नांमुळेच शिरुरला नव्याने कांदा बाजार भरविला जात असुन या बाजाराला  शेतक-यांचा भरघोस प्रतीसाद लाभत असुन अनेक शेतकरी चांगल्या दर्जाचा कांदा घेउन येत आहे.प्रतवारी करुन आवक होणार कांदा श्रीनगर,सिमला, गुवाहाटी, कटक, दिल्ली, अमृतसर, केरळ, मद्रास येथे विक्रीसाठी पाठवला जाणार आहे.मंगळवारी  कांद्याचे प्रमुख खरेदीदार बाबुशेठ बोरा यांचे के.बी.बोरा एक्स्पोर्ट या निर्यातदारांनी यार्डवरील 65 टन कांदा श्रीलंकेतील कोलंबो येथे निर्यात केला.

शिरूर तालुका व परिसरात गरवा जातीचा कांदा मुबलक प्रमाणात असुन या कांद्यास परदेशात मोठी मागणी असते. अजुनही अनेक निर्यातदार यार्डवर पुढील काही दिवसात कांदा खरेदीसाठी येणार असल्याचे गद्रे यांनी सांगीतले.यावेळी बाजार समितीचे संचालक बंडु जाधव, सचिव दिलीप मैड, यार्डवरील आडतदार, खरेदीदार व शेतकरी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या