आठवणः स्व. अरुण आबा गायकवाड...

Image may contain: 1 person, text

कोंढापुरीकै. अरुणआबा गायकवाड हे सर्वसामान्यांचे गोर-गरीब शेतकऱयांचे, कार्यकर्त्यांचे, गावोगावच्या सरपंच, सोसायटी चेअरमन, उपसरपंच, पदाधिकारी यांचे लाडके व्यक्तीमत्व म्हणजे आबा. तळागाळातील सर्वसामान्य शेतकऱयांपासून राजकारणातील मोठे कार्यकर्ते, नेत्यांपर्यंत आदराचे प्रेरणास्थान म्हणजे आबा. शिरूर तालुक्यातील हरीतक्रांतीचे प्रणेते, औद्योगिकरणाला जोरदार पाठिंबा देणारे नेते. आज तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातील कोणत्याही भागात गेले आणि "आबा' हे दोनच शब्द उच्चारले तरीही चटकन अनेकांच्या डोळ्यात पाणी येणारे समाजसेवी नेतृत्व म्हणजेच कै. अरुणआबा गायकवाड होय.

कोंढापूरीसारख्या छोट्या गावामधून आबांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरवात केली. तरुण वयात आबांनी कबड्डी या खेळाच्या माध्यमातून गावचे तालुक्याचे जिल्ह्याचे नेतृत्व केले. कबड्डी या खेळाला खऱया अर्थाने न्याय देण्याचे काम आबांनी केले. आज कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचविण्याचे काम केलेल्यांमध्ये आबांचेही योगदान आहे.

समाजाप्रती खूप मोठे योगदान देण्याचे कार्य अरुणआबांनी आपल्या राजकीय जीवनात केले. खेळामार्फत तरुण वयात आबांनी मोठा जनसंपर्क वाढवून आफाट मित्र परिवार जोडला. त्यांच्या काळात वाहनांची, मोबाईलची सुविधा उपलब्ध नसतानाही प्रत्येक वाडी-वस्तीवर पोहचणारे युवक नेतृत्व म्हणजे अरुणआबा.

मा. शरद पवार यांना आदर्श मानून आबांनी आपल्या राजकरणाला सुरवात केली. प्रथम शिरूर तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर तरुणांची प्रचंड फौजच्या फौज आबांनी उभी केली. राजकरणापेक्षा समाजकारण जास्त हे ब्रिद वाक्य त्यांनी तरुणांमध्ये पेरले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या