नगरपालिकेच्या लेखीपञानंतर खांडरेंचे आंदोलन स्थगित

शिरुर,ता.९ मार्च २०१८(प्रतिनीधी) : शिरुर शहराला होणा-या दुषित पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेल्या विरोधी नगरसेवक यांसह शिष्टमंडळाला नगरपालिकेने कार्यवाहीबाबत लेखी पञ दिल्याने सायंकाळी उशिरा आंदोलन स्थगित करण्यात आले.

शिरुर शहरात गेल्या काहीदिवसांपासुन सतत होणा-या अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार(दि.३) रोजी शिरुर नगरपालिकेसमोर विरोधी नगरसेवक मंगेश खांडरे हे बेमुदत धरणे आंदोलनाला बसले.यावेळी अनेक मान्यवरांनी शिरुर नगरपालिकेवर आरोपांच्या फैरी झाडल्या.गेल्या काही दिवसांपासुन शहराला अत्यंत घाणेरडे व अस्वच्छ,व पिवळसर रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत असुन या पाण्याची दुर्गंधी येत असल्याचा आरोप खांडरे यांनी करुन(दि.२७ फेब्रुवारी) रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते.यानंतर या प्रश्नावर पालिका सभागृहात चर्चाही करण्यात आली होती. यावेळी संबंधित ठेकेदार व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी खांडरे यांनी केली होती.माञ यावर ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला.गुरुवार(दि.८) पासुन सकाळी ११ वाजता  हे आंदोलन सुरु झाले.यावेळी लोकशाही क्रांती आघाडीचे रविंद्र धनक, माधव सेनेचे रविंद्र सानप, रिक्षा पंचायत चे अनिल  बांडे, भाजपाचे बाबुराव पाचंगे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र  क्षिरसागर, शिवसेनेचे सुनिल जाधव, राजेंद्र शिंदे, संजय बांडे, मनसेचे महेबुब सय्यद, अविनाश घोगरे, स्वप्निल माळवे, डॉ.वैशाली साखरे, लौकिक बोरा, हर्षद ओस्तवाल,शारदा भुजबळ,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष  संजय बारवकर, माजी नगरसेविका मायाताई गायकवाड,अश्विनी पोटावळे, दिपा धोञे, तारुअक्का पठारे, रामभाउ इंगळे, चांदभाई बळभट्टी मंहम्मद हुसेन पटेल,विजय नरके ,संदिप कडेकर, भाजपचे शहराध्यक्ष केशव लोखंडे, राजु शेख, हुसेन शहा,माजी नगराध्यक्ष नसीम खान, उमेश भोसले,वाहिद शेख,पिरमहम्मद शेख आदी उपस्थित होते.

यावेळी रिक्षा पंचायत चे अनिल बांडे यांनी नगरपालिकेवर घणाघाती आरोप करत सर्वात जास्त पाणीपट्टी शिरुर नगरपालिका आकारत असुन माञ स्वच्छ पाणी देण्यास नगरपालिका असमर्थ आहे.दरवर्षी अॉडिट मध्ये शिरुरनगरपालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ असल्याने पाणी पुरवठ्याचा ठेका देउ नये असा शेरा मारला जातो,परंतु नगरपालिकेकडुन ठेका देण्यास अट्टहास का  असा प्रश्न बांडे यांनी उपस्थित केला. रविंद्र धनक, माधव सेनेचे रविंद्र सानप,संजय बारवकर आदींची भाषणे झाली.

या प्रश्नावर पञकार परिषदेत उत्तर देताना पालिका सभागृह नेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, मावळते  पाणी पुरवठा सभापती मुजफ्फर कुरेशी म्हणाले कि, जो अशुद्ध पाणी पुरवठ्याचा आरोप केला जातोय तो चुकिचा असुन ते विरोधी नगरसेवक असुन विरोधाला ते विरोध करत आहे.पाणी हे पिण्यायोग्य असुन या पाण्यात बॅक्टेरिया नाही,पाण्याचा रंग थोडा पिवळसर असुन याचा वरिष्ठ पातळीवर शोध घेतला जात आहे व त्यानुसार कार्यवाही केली जात आहे.लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न असुन सर्व सदस्यांनी पाणी शुद्धीकरण ठिकाणची पाहणी केली असुन  पाणी शुद्धिकरण होत  आहे.तरीही ठेकेदाराला नोटिस दिली असुन फक्त विरोधाला विरोध करु नका, चुकिचे बोलुन लोकांमध्ये भ्रम  निर्मान करु नका, एक रुपयाचाही नगरपालिकेच्या कोणत्याही नगरसेवकाने भ्रष्टाचार केला नसुन केलेले आरोप सिद्ध करुन दाखवा असे आवाहन यावेळी करण्यात आले.व सर्व नागरिकांनी पाणी उकळुन प्यावे असेही नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान सायंकाळी मंगेश खांडरे यांच्यासह शिष्टमंडळाने शिरुर नगरपालिका कार्यालयात आंदोलनाची धार वाढवत आक्रमक पविञा घेतला.यावेळी या शिष्टमंडळाने हा नागरिकांच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न असुन वस्तुस्थिती निदर्शनास आणुन देत अखेर एक तासाच्या चर्चेतुन आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.खांडरे यांना नगरपालिकेने, शुद्धिकरणानंतर पाण्यात कोणता  दोष निर्माण होत आहे.या साठीची तपासणी करणेसाठी पाणी नमुने राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत,तपासणी अहवालाअंती दोष आढळल्यानंतर त्या प्रमाणे उपाययोजना करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी पञ दिले.यानंतर खांडरे यांच्यासह रविंद्र धनक, अनिल बांडे आदींनी उपोषण मागे घेत हा सत्याग्रहाचा विजय असल्याचे बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या