जगण्याचा हक्क आम्हांलाही द्या: पारधी समाज

Image may contain: 7 people, people standing
शिरूर, ता.९ मार्च २०१८ (प्रतिनीधी) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिरुर येथे प्रथमच पारधी समाज एकञ आला होता.या मेळाव्यामध्ये पारधी समाजातील महिलांनी दैनंदिन जगण्याच्या अडचणी व व्यथा मांडल्या.

या मेळाव्याचा मुख्य उद्देश पारधी समाजाचे विविध प्रश्न शासनासमोर मांडुन ते प्रश्न सोडवणे हा होता. या कार्यक्रमात शिरूरचे पोलीस निरिक्षक राजेंद्र कुंटे यांनी पारधी समाजास मार्गदर्शन केले. त्याचबरोबर इकोनेट संस्थेचे जितेंद्र कठाळे यांनी पारधी समाजातील मुला –मुलींसाठी शिक्षण किती महत्वाचे आहे हे पारधी समाजातील लोकांना सांगितले. त्यानंतर फासे पारधी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी पारधी समाजात असणारी जातपंचायत व बालविवाह या विषयावर बोलले.

या मेळाव्यात तहसिलदार रंजन भोसले यांनी पारधी समाजाचे जातीचे दाखले, शबरी घरकुल योजना, रेशन कार्ड व आधार कार्ड चे पश्न लवकरात लवकर कॅम्पच्या माध्यमातुन सोडवुयात असे आश्वासन दिले. या कार्यक्रमात सर्व शासकीय अधिकार्‍यांना पारधी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आल्या.शाळेत जाणार्‍या मुलांचे व सर्व सामांन्य पारधी समाजातील लोकांचे जातीचे दाखले कॅम्प घेवुन देण्यात यावेत,रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र हे कॅम्प घेवुन देण्यात यावेत,राहत्या घराखालील जागा नावे कराव्यात,शबरी घरकुल योजना आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्या मार्फत आदिवासी पारधी समाजास या योजनेअंर्तगत घरे देण्यात यावीत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रियांका जाधव यांनी पारधी समाजाच्या समस्या शासकीय अधिकार्‍यांच्या समोर मांडल्या व त्या लवकरात लवकर सोडविल्या जाव्यात याची मागणी तहसिलदार, प्रांत, गटविकास अधिकारी यांना केली. क्रांती संस्थेच्या अध्यक्ष सुनिता भोसले यांनी पारधी समाज कसा मागासलेला व सर्व शासकीय योजनांपासुन कसा दुर आहे याची माहिती शासकीय अधिकार्‍यांना दिली.

या कार्यक्रमासाठी इकोनेट संस्थेचे राहुल साळवी, आदिवासी फासे पारधी समाज संघटनेचे कार्यकर्ते, दैनिक जागरणच्या पत्रकार उमा, श्रीराम श्रीनिवासन, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शिंदे, कक्ष अधिकारी राजेश खंदारे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा संपर्कप्रमुख जितेंद्र काळे, महिला साहाय्यक कक्षाच्या अध्यक्ष शोभना पाचंगे, क्रांती संस्थेचे कार्यकर्ते, मयुर चव्हाण, रेणुका काळे, फाल्गुण भोसले, कोमल काळे, विजय भोसले इत्यादी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या