जागतिक महिलादिनी मलठण केंद्रात नारीशक्तीचा सन्मान

Image may contain: 9 people, people smiling, people standing and outdoor
अण्णापूर, ता.९ मार्च २०१८ (ज्ञानेश पवार) :
विविध क्षेञात भुमिका समर्थपणे निभावणा-या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी     व त्याद्वारे  समाजप्रबोधन करुन सावित्रीच्या लेकींना सर्वच  क्षेत्रात मान देण्याच्या हेतुने मलठण (ता. शिरुर) केंद्रातील सर्व  शाळांमध्ये जागतिक महिला दिनी विविध  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  आले.

निमगाव दुडे येथील प्राथमिक  शाळेत सावित्रीबाई फुले व भारताच्या  पहिल्या  महिला पंतप्रधान  इंदिरा गांधी यांच्या  प्रतिमांचे पूजन मुख्याध्यापिका सुनिता जगताप व खतिजा इनामदार यांच्या हस्ते करण्यात  आले. त्यानंतर  शाळेतील महिला शिक्षिका  व वर्षभर विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय  कामगिरी  करणाऱ्या  मुलींचा सन्मान  शाळा व्यवस्थापन  समितीचे अध्यक्ष गोविंदराव  गाडेकर व  इतर सदस्यांच्या हस्ते करण्यात  आला.

या शाळेतील  सहशिक्षक भानुदास पवार यांनी इंदिरा  गांधी व सावित्रीबाई फुले यांची  महती  पोवाड्यातुन सादर केली. अण्णापूर येथील प्राथमिक  शाळेत विद्यार्थ्यांनाच्या मातांचा सन्मान  कारभारी झंजाड गुरुजी व दादाभाऊ  वाघमारे यांच्या हस्ते करण्यात  आला. यावेळी या शाळेतील मुलींनी विविध वेषभुषा केल्या होत्या. येथे बाळासाहेब डांगे व प्रिया काळे यांनी महिला व मुलींना  मार्गदर्शन  केले. निमगाव भोगी शाळेत मुख्याध्यापिका वंदना थोरात यांनी महिला दिनाचे महत्त्व  विषद केले. मालन गायकवाड यांनी नारीशक्तीवर आधारित  विविध कविता सादर केल्या. आमदाबाद येथे मुख्याध्यापक जनार्दन फलके,रंजना पवार, विजया थोरात व मंगल तळोले यांनी शाळेतील  मुलींसह सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर  मनोज गांधी  यांनी नारीशक्ती या विषयी माहिती सांगितली. मुजावर वस्ती शाळेत आयोजित कार्यक्रमात  या सायली अर्जुन चौधरी या विद्यार्थीनीने मी सावित्री  बोलतेय ही एकांकीका सादर केली.

येवलेमाथा, चाणखणबाबावस्ती, रावडेवाडी याही शाळांमधुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  आले. दरम्यान मलठण शाळेत चालु असलेल्या  गणित संबोध प्रशिक्षण  कार्यक्रमात  केंद्रप्रमुख रामदास बोरुडे यांनी  उपस्थित  महिला  शिक्षिकांचे कौतुक  करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी  सर्व  शिक्षिकांनी एकत्र  येत विविध गीते व कविता सादर करत महिला दिन साजरा केला. एकंदरीतच  या महिला दिनी विविध  कार्यक्रमाद्वारे  मलठण केंद्रात नारी शक्तीला सलाम करीत त्यांचा सन्मान करण्यात आला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या