शिरुर तहसिलजवळ गाडीची काच फोडून चोरी

शिरूर, ता.९ मार्च २०१८ (प्रतिनीधी) :शिरुर तहसिल कार्यालयाचा कंपाउंडचा बाहेर पुणे नगर रोडवर झाडाचा खाली पार्किंग केलेल्या मारुती गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्यानी गाडीतील एक हजार रुपये व कागदपत्रे घेवून गेले.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍड. अनिल शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. ८ मार्च रोजी सकाळी शिंदे हे संकेत गोरडे व राजाराम डफळ यांच्या कामानिमित्त तहसिल कार्यालयात डफळ यांच्या मारुती सुझुकी कार क्रमांक एम एच .१४ डी एन .५३३२ मधून आले होते.

त्यावेळी तहसिल कार्यालयाच्या कंपाउंडच्या बाहेर गाडी पार्किंग केली होती. त्यावेळी त्यांच्या गाडीतील गोरडे याची महत्वाची कागदपत्रे व एक हजार रुपये अज्ञात चोरट्याने  चोरुन नेले.यासंदर्भात आधिक तपास एस आय शिंदे करित आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या