रुक्मिनी सोनवणे यांना आदिशक्ती सन्मान पुरस्कार

Image may contain: 11 people, people on stage, people standing and indoor
वाघाळे, ता. 9 मार्च २०१८(संदिप धायबर) : वाघाळे (ता.शिरुर) येथील रक्मिनी सोनवणे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदिशक्ती सन्मान पुरस्कार देउन गौरविण्यात आले.

शिरुर तालुका शिक्षक संघ, शिक्षक समिती व एम.बी. अष्टेकर ज्वेलर्स यांच्या वतीने आदर्श महिलांना सन्मानित करण्यात आले. रुक्मिनी सोनवणे यांनी कौटुंबिक जबाबदा-या पार पाडत असताना स्वत:च्या तीन मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यापैकी त्यांचे थोरले सुपुञ विश्वास सोनवणे हे शिक्षण क्षेञात असुन केंद्रप्रमुख या पदावर कार्यरत आहेत. द्वितीय चिरंजीव पुणे महापालिका शाळेत शिक्षक आहेत.तर बाळासाहेब  सोणवणे हे ढोकसांगवी येथील विद्यालयात मुख्याध्यापक पदावर काम करत आहेत.त्याचबरोबर त्यांच्या तीनही स्नुषा या शिक्षक म्हनुन काम करत आहेत.

रुक्मिनी सोनवणे या स्वत:निरक्षर असुनही त्यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळुन संपुर्ण कुटुंबाला शिक्षित केले असुन या द्वारे समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे.याच कार्याची दखल घेउन महिला दिनानिमित्त आदिशक्ती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी माजी आमदार सुर्यकांत पलांडे, पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, उपसभापती मोनिका हरगुडे, जि.प.सदस्या कुसुमताई मांढरे, स्वाती पाचुंदकर, सुनिता गावडे, पं.स.सदस्य विश्वास कोहोकडे, वाघेश्वर जिर्णोद्धार मंडळाचे सचिव संदिप धायबर, गणेश थोरात आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष  अनिल पलांडे यांनी केले तर शहाजी पवार यांनी सुञसंचालन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या