पांडुरंग विद्यामंदिरातील मुलींची जनजागृती रॅली

Image may contain: 6 people, people standing, people on stage, crowd and outdoorविठ्ठलवाडी, ता.१० मार्च २०१८ (प्रा.एन.बी.मुल्ला) : विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्यामंदिरातील विद्यार्थीनींनी महिला दिनानिमित्त रॅली काढून बेटी बचाव बेटी पढावचा संदेश दिला.

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे शिरूर तालुका कला शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रविणकुमार जगताप, संगीता गवारी व  भाऊसो वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पांडुरंग विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी  रॅली व ढोल लेझीम पथकामध्ये सहभागी होऊन महिला दिनाच्या दिवशी बेटी बचाव बेटी पढावो, स्त्री भ्रूण हत्या रोखाल तरच देश वाचवाल आदि घोषवाक्यांचे फलक घेवून या विद्यार्थिनींनी  गावातून जनजागृती केली.

या रॅलीमध्ये जि.प.सदस्या रेखा बांदल, पं.स.सदस्या अर्चना  भोसुरे, सरपंच अलका राऊत, मंडुबाई गवारे, लीलाबाई गवारे आदी मान्यवर महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख या  वेशभूषेतून सर्वधर्म समभावाचे  मुलींनी दर्शन दिले. या रॅलीतील ८०  विद्यार्थिनी नऊवारी साड्या व डोक्यावर भगवा फेटा परिधान करून सहभागी झाल्याने या विद्यार्थिनींकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या