विभागीय स्पर्धेत देवदैठणच्या खेळाडूंची चमक

शिरूर, ता.१० मार्च २०१८ (प्रा.संदीप घावटे) : विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या ' चला खेळुया' उपक्रमांतर्गत विभाग स्तरीय मैदानी स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्यातील देवदेठण येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.

जि. प. प्राथमिक शाळेतील सोहम बोरूडे याने लहान गटात उंच उड़ी क्रीडा प्रकारात  प्रथम क्रमांक मिळविला.तसेच विद्याधाम प्रशाला देवदैठणच्या वेदिका धावडे हिने लहान गटात २००० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला तर शुभांगी वाखारे हिने मोठया गटात २०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती मुख्याध्यापक संभाजी शेळके यांनी दिली.

या स्पर्धत नाशिक विभागातील नाशिक,धुळे,जळगाव, नंदूरबार व नगर या पाच जिल्हयातील खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धा ५ मार्च रोजी संपन्न झाल्या.

यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक संदीप घावटे, अमोल कातोरे, सतीश झांबरे, प्रशांत वाळुंज, सतीश कौठाळे यांचे मार्गदर्शन लाभले.या खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे मुख्याध्यापक संभाजी शेळके, संस्थेचे अध्यक्ष सुकुमार बोरा, सचिव तु. म.परदेशी, शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र भटेवरा, सरपंच जयश्री गुंजाळ, उपसरपंच पुजा बनकर, यांनी अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या