'आकांक्षा'चा वर्धापनदिन उत्साहात साजरा

शिरुर, ता.१० मार्च २०१८ (प्रतिनीधी) : विशेष मुलांनी बहारदार केलेले नृत्ये अन उपस्थितांनी दिलेली दाद यांसह विविध कार्यक्रमांनी आकांक्षा एज्युकेशनल फौंडेशनचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शिरुर येथील दोन विशेष मुलींच्या आई असणा-या राणीताई चोरे यांनी गेल्या दोन वर्षांपुर्वी आकांक्षा एज्युकेशनल फौंडेशनची स्थापना केली.या संस्थेला दोन वर्षे पुर्ण झाल्याने या संस्थेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षपुजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. बीड जिल्हयातील शांतिवन येथे वंचित,अनाथ व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतक-यांच्या हजारो मुलांना स्वत:साविञी बनुन शिक्षण देणा-या कावेरीताई नागरगोजे यांचे यावेळी व्याख्यान झाले.या कार्यक्रमात किलबिल किलबिल पक्षी बोलती, लुंगी डान्स अन मी हाय कोळी या गाण्यांवर विशेष मतिमंद मुलांनी केलेल्या डान्सनी उपस्थितांची वाहवा मिळविली.स्वत:च्या पदरी जन्मलेल्या दोन विशेष मुली यांच्यातुन प्रेरणा घेत रामलिंग रोडवर सुरु केलेल्या आकांक्षा एज्युकेशनल फौंडेशनची स्थापना केल्यानंतर आजतागायत या संस्थेत २० विशेष मुले शिक्षण घेत असुन या मुलांबरोबरच पालकांचेही समुपदेशन केल्याने या विशेष मातांनाही एकप्रकारे जगण्याचे बळ मिळाल्याचे राणीताई चोरे यांनी  प्रास्ताविकात नमुद केले. संस्था सुरु केल्यानंतर दोन वर्षांचा खडतर प्रवास ऐकताना संपुर्ण सभागृहच स्तब्ध झाले. यावेळी अनेकांना अश्रु अनावर झाले. यावेळी कोणी आर्थिक मदत केली, कोणी शालेय साहित्य दिले तर कोणी या कार्यातच खारी उचलला. यामुळेच २० विशेष मुलांचे संगोपन करण्यात येत असल्याचे त्यांनी या वेळी आवर्जुन सांगितले.

कितीही दु:ख व अडचणी आल्यातरी शिरुरकरांनी विशेष मुलांप्रती स्नेहभाव ठेवत विशेष मातेला जगण्यासाठी बळ दिल्याचे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विनाताई गोखले यांनी सांगत विशेष मुलांना समाजात ताठ मानेने जगता यावे यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत या वेळी व्यक्त केले. याच कार्यक्रमात विशेष नारी सन्मान कावेरीताई नागरगोजे यांना देण्यात आला. आदर्श शिक्षिका म्हणुन माधुरी गरगट्टे यांना तर आदर्श पालक निघोज येथील जावळे आजींना देण्यात आला.या कार्यक्रमात विशेष सहकार्य करणा-या व मान्यवरांना ट्रॉफी, झाड व पुस्तक देउन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला शिरुर न्यायालयाच्या न्यायाधीश आर.एन.खान, शिरुर चे तहसिलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, गटविकास अधिकारी संदिप जठार, शिरुर बार असो. अध्यक्ष निवृत्ती वाखारे, अॅड.सिमा काशीकर, अॅड. विकास कुटे, श्रीगोंदा  जि.प.सदस्य कोमल वाखारे, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, सी.ए.आदेश गुंदेचा, संस्थेचे विश्वस्त मनसुख गुगळे, डॉ. मनिषा चोरे, गणेश सातव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा.क्रांती पैठणकर यांनी केले तर आभार ज्ञानेश घोडे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या