कवठे दरोड्यातील फरारी आरोपीस नऊ वर्षांनी अटक

शिरूर, ता.११ मार्च २०१८ (प्रतिनीधी) : कवठे यमाई (ता. शिरुर) येथे नऊ वर्षांनी दरोडा टाकून फरारी झालेल्या अट्टल गुन्हेगारास नऊ वर्षांनंतर अटक करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवठे येमाई येथे २००९ साली बबन दाभाडे यांनी सदर घटनेची फिर्याद शिरुर पोलीस स्टेशन ला नोंदविली होती. चोरट्यांनी घराची खिडकी मोडून त्याद्वारे घरात प्रवेश करुन घराचा मुख्य दरवाजा उघडला होता. यावेळी घराबाहे झोपलेल्या फिर्यादीचे वडील बापू व आई विठाबाई, बहिन ताराबाई यांना लोखंडी गजाने मारहान करत जबर जखमी करत यांच्याजवळील ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दोन गंठण, कर्णफुले, रोख रक्कम दहा हजार रुपये घेउन पसार झाले होते.

या प्रकरणी पुणे ग्रामीण गुन्हे शाखा व शिरुर पोलीस या दरोड्यातील आरोपींचा शोध घेत होते. अखेर यातील सुधीर निजाम काळे यास गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली. हा गेल्या नऊ वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर शिक्रापूर, लोणीकंद, कर्जत, श्रीगोंदा, शिरुर आदी पोलीस स्टेशनवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यावेळी गुन्हे शाखेचे दत्ताञय गिरमकर यांनी या आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता  व्यक्त केली आहे.

या आरोपीला पकडण्याकामी गुन्हे शाखेचे प्रमुख दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गणेश मुंढे, सहायक फौजदार दत्ताञय गिरमकर, पोलीस हवालदार राजू मोमीन, पोलीस हवालदार सुभाष घारे, पोलीस नाईक नितीन गायकवाड, कोकरे, नवले आदींनी तपासात महत्त्वाची भुमिका बजावली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या