राणीताई चोरे यांचा 'आदर्श माता' म्हणून गौरव

बारामती, ता.११ मार्च २०१८(प्रतिनीधी) : बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट च्या वतीने शिरुर येथील आकांक्षा एज्युकेशनल फौंडेशनच्या संस्थापिका राणीताई चोरे यांचा आदर्श माता म्हणुन नुकताच गौरव करण्यात आला.

बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट च्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते उल्लेखनीय क्षेञात काम करणा-या राज्यातील २६ महिलांचा जागतिक महिलादिनी मानपञ व साडी-चोळी देउन सन्मान करण्यात आला.

या मध्ये माणच्या खाशिबाई इंदलकर, सोलापुरच्या कमलाबाई भारुड,नाशिकच्या सुचेता सौंदाणकर, मावळच्या ज्योती नागपुरकर, कोल्हापुरच्या पुजा सन्नके, माजलगावच्या सत्यभामा सौदरमल, मिरजच्या शकुंतला खोत, लोणी काळभोरच्या संगिता  काळभोर, इंदापुरच्या निमल जाधव,उचलनच्या स्मिता शहा,करमाळ्याच्या स्वाती माने, साता-याच्या कोमल गोडसे, सोलापुरच्या अनिता  सराटे, पिंपळदरीच्या पुष्पा मुंडे, आंबेगावच्या गायञी राजगुरव,अकोलेच्या राहिबाई पापेरे,बीडच्या सृष्टी सोनवने, धारणीच्या शशिकला धुर्वे,निमगाव केतकीच्या शुभांगी बरळ, आष्टीच्या उषा जगदाळे, चंद्रपुरच्या पारोमिता गोस्वामी, बारामतीच्या द्रौपदा वाडिले, लिलावती ढेंबरे, विमल दळवी, शोभा पवार आदींचा सन्मान करण्यात आला.

कोमल गोडसे यांनी फु्फ्फुस व ह्रदय ट्रांन्सप्लॅंट चे कार्य विषद केले तर राणीताई चोरे यांनी शिरुर येथील आकांक्षा फौंडेशनचा खडतर प्रवास उपस्थितांसमोर मांडला.यावेळी अवघे सभागृहच काही काळ अश्रुंमध्ये डबडबुन गेले.काही काळ वातावरणच स्तब्ध झाले.

त्याचप्रमाणे विविध क्षेञातील महिलांनी कार्याचा लेखाजोखा मांडला.राणीताई चोरे यांना सन्मानित केल्याबद्दल शिरुर शहरासह तालुक्यातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या