ढमढेरे महाविद्यालयात पदवी ग्रहण समारंभ संपन्न

तळेगाव ढमढेरे , ता. १२ मार्च २०१८ (प्रा.एन.बी.मुल्ला) : आपल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन अॅड.रावसाहेब करपे यांनी केले.

तळेगाव ढमढेरे येथे सावित्रीबार्इ फुले पुणे विद्यापीठ व साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदवीग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून करपे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील होते.यावेळी बोलताना अॅड.करपे पुढे म्हणाले की, पदवी घेवून बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांनी सामाजीक बांधीलकी जोपासावी.स्पर्धेच्या युगात गुणवत्तेला अत्यंत महत्व असल्याने युवकांनी उच्च ध्येय डोळयासमोर ठेवून वाटचाल करावी असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.अॅड.करपे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील 25 पात्र पदविधरांना पुणे विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली.

पदवी ग्रहण करताना विद्याथ्र्यांच्या चेह-यावरील आनंद याप्रसंगी ओसांडून वाहत होता.यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे, उपप्राचार्य डॉ.पराग चौधरी, डॉ.संदीप सांगळे,  परीक्षा विभाग प्रमुख डॉ.मनोहर जमदाडे, डॉ.रविंद्र भगत, डॉ.दत्तात्रय वाबळे, विद्यापीठ प्रतिनिधी अक्षय देंडगे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मनोहर जमदाडे यांनी केले. डॉ. रविंद्र भगत यांनी सुत्रसंचालन केले तर डॉ. पराग चौधरी यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या