यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी

शिरूर, ता. १२ मार्च २०१८ (प्रतिनीधी) : स्व.यशवंतराव चव्हाण यांची जयंती शिरुर शहरातील यशवंतराव चव्हाण सामाजिक, शैक्षणिक प्रतिष्ठाणच्यावतीने विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.

सकाळी मान्यवरांच्या हस्ते स्व.यशवतंराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय बारवकर यांनी प्रास्ताविक केले.तर शहरातील ग्रंथालयास प्रेरणादायी पुस्तके भेट देण्यात आली.यावेळी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सुकुमार बोरा,रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल जाकिरखान पठाण,रमेश कर्नावट,महावीर कि रोटी,रविंद्र धनक,डॉ.येणारे, मुस्लिम युवा मंच,अॅड.सतीषआबा गवारी,वैशाली गायकवाड व अनिल गायकवाड,मुस्लिम युवा मंच, आदींचा सत्कार करण्यात आला.लहान मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, रविंद्र धनक, जाकिरखान पठान आदींनी मनोगते व्यक्त केली तर कोमल थोरात यांनी सुञसंचालन केले व आबिद शेख यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला प्रा.चंद्रकांत धापटे, माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे,नगरसेविका ज्योती लोखंडे, माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी नगरसेविका मायाताई गायकवाड, मुस्लिम जमातचे इक्बालभाई सौदागर, माजी नगराध्यक्ष नसीम खान, नगरसेवक मंगेश खांडरे यांसह डंबेनाला मिञ मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.  

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या